पीक कर्जासाठी नाबार्डचा नवा नियम; शेतकऱ्यांसाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता, जाणून घ्या सविस्तर
कोल्हापूर: नाबार्डने (राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक) पीककर्ज वाटपासाठी नवीन निकष लागू केले आहेत, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांसाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर्षीपासून शेतजमिनीच्या मालकी उताऱ्यावर (८अ) तुमच्या वाट्याला जेवढे क्षेत्र आहे, त्यानुसारच पीककर्ज मंजूर केले जाणार आहे. या बदलामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीककर्जाच्या रकमेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. [...]