कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)
सुरगाणा (प्रतिनिधी ) नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ (रजि.) सलग्न सुरगाणा तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रतन चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक जिल्हाध्याक्ष यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्याक्ष अण्णासाहेब बोरगुडे यांनी सुरगाणा तालुका मराठी पत्रकार संघाची निवडणूक घेण्यासाठी सापुतारा (गुजराथ) येथील हॉटेल लेकव्हीव येथे विशेष बैठक पार पडली.याबैठकीत सुरगाणा तालुका मराठी पत्रकार संघाची पुढील एक वर्षासाठी कार्यकारिणी निवडण्यात आली.बाजीराव खैरणार यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
प्रारंभी याबैठकिचे प्रास्ताविक रतन चौधरी यांनी केले.यावेळी त्यांनी पत्रकार संघाच्या कार्याचा धावता आढावा घेतला त्यानंतर सर्व सभासदापुढे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला.विहित मुदतीत प्रत्येक जागेसाठी प्रत्येकी एक-एक उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने सदरची निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी बाजीराव खैरणार यांनी केली.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा संस्थापक-जिल्हाध्यक्ष यशवंत पवार,जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब बोरगुडे यांचेहस्ते सत्कार करण्यात आला.
नवनिर्वाचित कार्यकारणी पुढील प्रमाने अध्यक्ष- रतन चौधरी, कार्याध्यक्ष-शाम खैरनार, उपाध्यक्ष -लक्ष्मण पवार पांडूरंगभाई चौधरी, सरचिटनिस – अशोक गवळी. सहसरचिटनिस -नामदेव पाडवी खजिनदार -हिरामण चौधरी, सहखजिनदार – नशीर माणियार, संघटक- गणेश धुळे, सहसंघटक- एकनाथ बिरारी, समन्वयक-विष्णू बोरसे, कार्यकारणी सदस्य- भास्कर भोये, नितीन चौधरी, वाजीद शेख, शंकर गायकवाड, तालुका पत्रकार संघाच्यावतीने नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंत पवार, जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे, अधिकारी बाजीराव खैरणार यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.रतन चौधरी यांनी सर्वांचे आभार मानले.
@ चौकट-
नाशिक जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी या पुर्वी वेळोवेळी आंदोलने-मोर्चे शांततेच्या मार्गाने यशस्वी केले आहे.पत्रकार संरक्षण कायदा होण्यासाठी अनेक वर्षे महाराष्ट्र शासनाशी संघर्ष केला.कोणत्याही पत्रकारावर बातमीमुळे अन्याय होत असेल तर तो सहन केला जाणार नाही त्यासाठी योग्य वेळी योग्य ठिकाणी न्याय मागितला जाईल त्यासाठी आपले संघटन ही काळाची गरज आहे.
-यशवंतराव पवार
संस्थापक जिल्हाध्याक्ष
नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ (रजि.)