कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): दिघवद येथे हवामान अनुकूल तंत्रज्ञान प्रात्यक्षिक संपन्न नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा दोन) अंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येत आहे अशी माहिती तालुका कृषी अधिकारी निलेश मावळे यांनी दिली उपविभागीय कृषी अधिकारी भट्टू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कृषी अधिकारी संगीता मिसाळ यांनी मौजे दिघवद येथे शेतकरी सदाशिव गागरे यांच्या शेतात रुंद सरी वरंबा पद्धतीने बेड तयार करणे तसेच बेडवर बियाणे टोकन करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले या तंत्रज्ञानाचे फायदे समजून सांगताना त्या म्हणाल्या की लहरी हवामान अतिवृष्टी झाल्यास अतिरिक्त पाणी सरीतून निघून जाते तर पावसाच्या खंडात पिके तग धरतात असे त्यांनी सांगितले शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे आव्हान दिघवद येथील कृषी सहाय्यक संगीता मिसाळ यांनी केले यावेळी दिघवदचे सरपंच रावसाहेब गांगुर्डे, प्रताप गांगुर्डे, सदाशिव गागरे, प्रशांत गांगुर्डे, वसंत कोल्हे, ज्ञानेश्वर गांगुर्डे,बबन गाडे, बाबाजी गांगुर्डे,सोनू गांगुर्डे,नारायण गांगुर्डे,आदी शेतकरी उपस्थित होते

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »