चांदवड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त श्री गुरुजी रुग्णालय, नाशिक व स्व. मा. आ. जयचंदजी दि. कासलीवाल चॅरिटेबल ट्रस्ट, चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मा. श्री. भूषणभैया कासलीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर उत्साहात पार पडले.
छत्रपती शिवाजी महाराज चौक, चांदवड येथील श्री विघ्नहर्ता गणेश मंदिर परिसरात आयोजित या शिबिरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
शिबिरामध्ये एकूण २६ रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर ११३ नागरिकांची विविध आरोग्य तपासणी करण्यात आली.
शिबिरात शुगर, रक्तदाब, ब्लड, ऑक्सिजन तपासणी तसेच ईसीजी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी डॉ. गौरव काळे (ऑर्थोपेडिक सर्जन) व डॉ. अभय शुक्ला (जनरल फिजिशियन) यांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक सल्ला दिला.
आरोग्य तपासणी दरम्यान मा. श्री. भूषण कासलीवाल, अशोक काका व्यवहारे, जगन्नाथ निखिल राऊत, बाळा पाडवी, महेंद्र कर्डिले, संतोष भालेराव, आकाश बडोदे, मुन्ना गांधी, सुधीर कबाडे सुरेश देशमुख मयूर मोरे आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
तसेच शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. इशिता अहुजा, दीपक पाटील, सविता पाटील, शिवानी ठोंबरे, स्वाती सरंजत, मयुरी चौधरी, खुशबू सोनवणे, वैष्णवी निकम, अभिजीत हिरे, बलवीर मांडवलकर, तसेच डॉ. जयेश डाके, डॉ. अभय शुक्ला, डॉ.स्वप्नील बिरारी, सुरज पंडित, निलेश पवार, राणी शिंदे, योगिता जगताप, अंगती तुळंकर आदींनी आपापली जबाबदारी पार पाडत शिबिराचे नियोजन व अंमलबजावणी उत्तम प्रकारे सांभाळली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी परिश्रम घेतले असून, नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. समाजोपयोगी उपक्रमांमुळे आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होत असून, अशा शिबिरांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
