दशरथ ठोंबरे (पत्रकार) काजीसांगवी:– हिंदु गोरक्षक श्री १००८ महामण्डलेश्वर मुक्तानंदगिरी बापुजी महाराज मुंगसापुर (जेहुर)ता.कन्नड आश्रमात काही समाजकंटकानी मुक्तानंदगिरी महाराजला शिंवीगाळ करुन मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याने भक्तीपरिवारत संतापी लाट उसळली असुन या घटनेचा चांदवड तालुकयातील बाबाजी भक्तपरिवाराकडुन निषेध केला असुन समाजकंटकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे .
मुंगसापुर येथे संत श्रेष्ठ जनार्दन स्वामीचे शिष्य १००८महामण्डलेश्वर मुक्तानंदगिरी महाराज यांचे आश्रम असुन या आश्रमात सर्वात मोठी गोशाळा व हजारो औषधी वनस्पती लागवड केलेल्या आहे याच आश्रम परिसरात काही समाजकंटकानी बदनामी कारक वृत्त पसरून अन्यायकारक भुमिका घेत महाजाना शिवगाळ मारहाणकरुन जीवे मारण्याची धमकी दिल्याने भक्तपरिवारामध्ये संतापी लाट उसळली असुन या घटनेचा सर्व स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. शांतताप्रिय व समाजसेवक म्हणून ओळख असलेल्या महाराजांवर झालेला हा हल्ला अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचे भक्तपरिवाराकडुन बोलले जात आहे
या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री व संरक्षण मंत्रीयांना पाठवण्यात आले असुन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने आश्रम परिसरात पोलीस संरक्षण पुरवावे अशी मागणी बाबाजी भक्त परिवाराकडुन करण्यात येत आहे
बाईट:— मुक्तानंद गिरी महाराज यांच्यावर मुंगसापूर येथे आश्रमात काही समाजकंटकाकडून अन्यायकारक झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करत असून अशा थोर महान तपस्वी ब्रह्मचारी संतांवर झालेल्या हल्ल्यांची प्रशासनाने दखल घेऊन समाजकारणावर कठोर कारवाई करावी:- श्रीहरी ठाकरे (चांदवड बाबाजी भक्त परिवार)
फोटो:–मुक्तानंदगिरी महाराज यांचा फोटो

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »