कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) :उर्धूळ येते श्रीराम मंदिर अकरावा वर्धापन दिनानिमित्त श्रीराम जन्मोत्सव व श्रीराम कथा संपन्न झाली रामनवमीच्या दिवशी नाशिक येथून साईराम मित्रमंडळ व तरुण मित्रमंडळ यांनी गंगाजल व मशालआणून सकाळी आठ ते दहा या वेळेत भव्य अशी गंगाजल व मशाल मिरवणूक झाली नंतर रामजन्माचे भजन होऊन प्रसादरूपी फराळ चा कार्यक्रम झाला. दुपारी चार ते सहा या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ह भ प ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचा सुश्राव्य असा कीर्तनाचा कार्यक्रम होऊन सायंकाळी फराळाचा महाप्रसाद झाला याप्रमाणे रामनवमीच्या दिवशी राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात उत्साहात पार पडला.
दिनांक 27 मार्च पासून महाराष्ट्रातील नामवंत रामायणाचार्य विदर्भ रत्न रामरावजी महाराज ढोक यांची श्रीराम कथा सुरू झाली कथेचे स्वरूप अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर होते कथाकाळात उर्धूळ मधील वातावरण व पंचक्रोशीतील वातावरण राममय झाले श्रीरामकथा ही चांदवड तालुक्यातील विदर्भ रत्न रामरावजी महाराज ढोक यांची पहिलीच श्रीराम कथा होती कथा श्रवण करण्यासाठी परिसरातील व तालुक्यातील तसेच जिल्ह्यातूनही भाविकांनी कथा श्रवणाचा आनंद घेतला कथेचे नियोजन आणि स्वरूप पाहता ही कथा अतिशय चैतन्यमय व वैशिष्ट्यपूर्ण ठरली
श्रीराम कथेसाठी महाराष्ट्रातील साधुसंतांची उपस्थिती लाभली व त्यामुळे कथेची सुंदरता अधिकच उजाळून निघाली कथेसाठी श्री संत जगद्गुरु शांतिगिरी महाराज हे उपस्थित राहिले बाबाजींची पालखी मिरवणूक होऊन परमपूज्य जगद्गुरु शांतिगिरी महाराज यांचा सत्संग झाला.
श्रीराम कथेच्या कालावधीत महाराष्ट्रातील साधुसंत महंत महामंडलेश्वर 1008 शिवगिरीजी महाराज,जयदेव पुरीजी महाराज, सुजित महाराज,लखनगिरीजी महाराज कमल गिरीजी महाराज व काल्याच्या दिवशी गावचं भूमिपुत्र अंतरराष्ट्रीय भविष्कार महामंडलेश्वर 1008 मुक्तानंदगिरीजी महाराज यांनी आशीर्वाद रुपी अनमोल मार्गदर्शन केले.
त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ह भ प परमेश्वर महाराज जायभावे, ह भ प तुकाराम महाराज जेहूरकर, ह भ प तुकाराम महाराज निकम, ह भ प नवनाथ महाराज गांगुर्डे, ह भ प नामदेव महाराज गांगुर्डे,ह भ प गोरख महाराज कुदळ,ह भ प निवृत्ती महाराज काळे, ह भ प दौलत महाराज ठोंबरे, ह भ प अशोक महाराज निकम त्याचप्रमाणे परिसरातील वारकरी संप्रदायातील नामवंत कीर्तनकार गायक तसेच गुनिजन आवर्जून उपस्थित राहिले तालुक्यातील नामवंत कीर्तनकार समाधान महाराज पगार यांनीही उपस्थित राहून नियोजनाचे कौतुक केले तसेच हरिभक्त पारायण अर्जुन महाराज गांगुर्डे यांच्या संस्थेतील बाल गोपाल वारकऱ्यांनी दररोज हरिपाठ हरिपाठ साठी येऊन कार्यक्रमाची शोभा अजूनच वाढवली
श्रीराम कथेच्या कार्यक्रमासाठी राजकीय व सामाजिक अनेक मान्यवरांची उपस्थिती राहिली मा. खा.भास्कर भगरे सर मा.आमदार ड्रॉ.राहुल दादा आहेर तसेच संजय शेठ पिंगळे प्रसिद्ध कांदा व्यापारी वाशी मार्केट भूषणजी कासलीवाल, नितीन दादा आहेर, डॉक्टर आत्माराम कुंभार्डे,करण गायकर,गणेश निंबाळकर,संजय जाधव सुखदेव जाधव, दिगंबर वाघ,योगिता चौधरी,मनोज शिंदे, विलास भवर, योगेश ढोमसे,श्याम जाधव प्रसाद सोनवणे, मुन्ना मोरे, दत्तात्रय आबा गांगुर्डे उपस्थित होते
कार्यक्रमाची व्यवस्था व नियोजन पाहून विदर्भ रत्न रामरावजी महाराज ढोक यांनी सर्व उर्धुळकर एका आईची लेकर होऊन केलेलं केलेलं काम आणि त्यातून हे भव्य दिव्य सोहळा झाला.वारकरी संप्रदायात सुंदरता,शिस्त, भव्यता,याचा सुंदर मिलाप उर्धूळ करांनी निर्माण करून एक वेगळा आदर्श घालून दिला असे अगदी अंतकरणापासून कौतुक केले
हा सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उर्धूळमध्ये सर्व उर्धुळकर बालगोपाल तरुण युवक महिला माता ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थ यांचा एक अतिशय सुंदर हेवा वाटावा असा अविस्मरणीय ऐतिहासिक सहभाग व उत्साह यांच्या जोरावर कार्यक्रम संपन्न झाला
श्रीराम कथेची भव्यता वाढवण्यासाठी आलेले कथाव्यास विदर्भरत्न रामायनाचार्य रामरावजी महाराज ढोक,सर्व साधू संत, वारकरी सांप्रदायातील कीर्तनकार, गुणिजन,सर्व भाविक या सर्वांचे उर्धुळकरांच्या वतीने ऋण व्यक्त करण्यात आले

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »