दिघवद वार्ताहर दिघवद येथे महाशिवरात्री निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आज पासून. चांदवड तालुक्यातील दिघवद येथे सालाबादप्रमाणे महाशिवरात्री निमित्ताने वै, शंकर बाबा माळुंदे यांच्या कु्पाशिवादाने व ह, भ प नामदेव महाराज गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाने शिव लिला ग्रंथ पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक १३ /२/२० २६ शुक्रवार पहाटे कलश पुजण घटस्थापना ध्वज पुजण विणापुजण ग्रंथ पुजण समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ व सिध्देश्वर भक्त मंडळ दिघवद यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत रोज पहाटे पहाटे काकडा भजन उर्धूळ बोपाणे व दिघवद परिसरातील भजनी मंडळ व ग्रामस्थ करणार आहे व शिवलिला ग्रंथ पारायण व सायंकाळी हरी पाट व रात्री ९ते११ किर्तनाचे आयोजन करण्यात येणार आहेत शुक्रवार दिनांक १३रोज हे भ प विक्रम महाराज काळे यांचे किर्तन तर शनिवारी १४ रोज ह भप संजय महाराज दुकळे यांचे तर रविवार १५रोज ह,भ, प, स्वातीताई देवरे यांचे किर्तन होणार आहेत तर सोमवारी सकाळी ९ते११वा, ह,भ, प, शरद महाराज सरोदे यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहेत या कार्यक्रमाला शिवभक्त मंडळ गणेश मित्र मंडळ एकता गणेश मंडळ जयमल्हार भक्त परिवार स्वाध्याय परिवार जय बाबाजी भक्त परिवार संत निरंकारी भक्त परिवार समस्त भजनी मंडळ व सिध्देश्वर भक्त मंडळ वदिघवद बोपाणे उर्धूळ दहिवद आधी ग्रामस्थ विशेष सहकार्य करणार आहे या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सिध्देश्वर भक्त मंडळ दिघवद यांनी केले आहे

