कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) :- चांदवड येथे नाशिक विभागाचे धर्मादाय सह आयुक्त मा.श्री.विवेकजी रमेश सोनुने यांनी प्राचीन श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर व पुरातन आदिशक्ती श्री रेणुका माता मंदिर येथे सदिच्छा भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले यावेळी धर्मादाय सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे निरीक्षक मा.श्री.प्रसाद अत्तरदे साहेब उपस्थित होते त्याप्रसंगी त्यांचा सन्मान करण्यात आला.
समवेत संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधी संस्थान त्र्यंबकेश्वरचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे, रेणुका देवी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक सुभाष पवार,इच्छापूर्ती गणेश मंदिराचे अध्यक्ष राजेंद्र शर्मा,कोषाध्यक्ष राजेंद्र संकेलचा, तुषार काटेकर,अंकुश निंबकर तिसगावचे माजी सरपंच कैलास खैरे,नवनाथ सोनवणे आदी उपस्थित होते.
चांदवड ही ऐतिहासिक भूमी आहे अनेक इतिहासाची साक्ष ही सह्याद्रीची पर्वत रांग देत आहे तालुक्यात अनेक पुरातन मंदिरे,वास्तू,किल्ले,परंपरा,इतिहास याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.चांदवड तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा रंगमहाल आज अनेक साक्ष देत आहे.त्यामुळे चांदवड ला प्रत्येक ठिकाणी ऐतिहासिक वारसा लाभला आहे..
