कैलास सोनवणे (दिघवद) : त्रंबकेश्वर. 31 जानेवारी 2026 प्रतिनिधी
संत निवृत्तीनाथ महाराजांनी योगसाधनेच्या माध्यमातून आत्मज्ञानाचा सर्वोच्च अनुभव प्राप्त केला. त्यांनी अध्यात्म हे केवळ ग्रंथांपुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष आचरणातून समाजासमोर ठेवले. त्यांचे विचार आजही समाजासाठी मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी केले.
त्र्यंबकेश्वर येथे संत श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी परिसरातील प्रशासकीय इमारत व दर्शनबारी मंडप लोकार्पण कार्यक्रम आज पार झाला. त्यावेळी ते बोलत होते. मागील काळात प्रसाद योजनेच्या माध्यमातून आठ कोटीची कामे संत निवृत्तीनाथ मंदिर परिसर विकासासाठी झाली होते त्याचे लोकार्पण झले.यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, खासदार भास्कर भगरे, पर्यटन विभागाचे स्थापत्य अभियंता महेश बागुल, त्र्यंबक नगर परिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, माजी खासदार हेमंत आप्पा गोडसे, लावितकार महाराज ,मुरलीधर पाटील श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ घोटेकर, सचिव श्रीपाद कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री श्री. शेखावत म्हणाले की, संत निवृत्तीनाथ महाराज यांनी अध्यात्माचा खरा अर्थ सर्वसामान्यांना समजावून दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्म सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले आणि भक्ती व ज्ञान यांचा सुंदर संगम घडला.
संत निवृत्तीनाथ महाराजांनी समाजाला दिलेला संदेश साधा पण प्रभावी होता. त्यांचे कार्य केवळ आध्यात्मिक नव्हते, तर सामाजिकदृष्ट्याही महत्त्वपूर्ण होते. त्यांनी समाजात समता, बंधुता आणि सदाचार यांचे बीज रोवले. पुढे भाषणात त्यांनी वारकरी संप्रदायाचा गौरव केला आणि संत निवृत्तीनाथ महाराज की जय म्हणून भाषणाला प्रारंभ केला होता.
संतांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण विकसित भारताकडे वाटचाल करीत आहोत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र पुरस्कृत प्रसाद योजनेंतर्गत तीर्थक्षेत्रांमध्ये येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना चांगल्या सुविधा देऊन त्या ठिकाणांचा नियोजित आणि शाश्वत विकास करण्यात येत आहे. या योजनेतून संत श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी परिसरातील प्रशासकीय इमारत व दर्शनबारी मंडपाचे काम करण्यात आले आहे. येणाऱ्या काळात उर्वरित कामेही प्रसाद योजनेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व कोनशिला अनावरण झाले. या क्रमांकला वारकरी संप्रदायातील मान्यवरांसह नगरीतील नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.सोहळा येथे साठी संत निवृत्तीनाथ मंदिराचे विश्वस्त
अमर ठोंबरे, माधवदास राठी, कांचन जगताप ,निलेश गाढवे नवनाथ गांगुर्डे, राहुल साळुंखे, जयंत महाराज गोसावी, योगेश गोसावी मुठाळ महाराज व्यवस्थापक गंगाराम झोले सहकारी मुळाने व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »