काजीसांगवीः उत्तम आवारे पत्रकार
📍 दिल्ली

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा. ना. श्री. नितीन गडकरी साहेब यांची दिल्ली येथे भेट घेऊन राष्ट्रीय महामार्ग-३ वरील आपल्या चांदवड तालुक्यातील राहुड घाटात उड्डाणपूल/वायाडक्टची तरतूद करण्यासंदर्भात सविस्तर आणि सकारात्मक चर्चा केली.

नुकताच राहुडघाटात टँकरचा दुर्दैवी अपघात होऊन ३ जणांचा मृत्यू झाला. टँकरमधून गॅस गळती झाल्याने घाट परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आणि नागरिकांना श्वास घेण्यास त्रास झाला. वाहतूक विविध मार्गांवर वळवावी लागली आणि यामुळे राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी निर्माण झाली होती.

राहुडघाट हा प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती, तीव्र वळणे, तीव्र चढ- उतारांमुळे अपघातप्रवण ‘ब्लॅकस्पॉट‘ ठरला आहे. एनएचएआयकडून अल्पकालीन सुरक्षा उपाययोजना केल्या जात असल्या तरी कायमस्वरूपी आणि दीर्घकालीन तोडगा म्हणून ६ पदरी उड्डाणपूलाची तरतूद करणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी मी नमूद केले. वारंवार होणारे अपघात आणि जीवितहानीची गंभीरता लक्षात घेता हा ‘ब्लॅकस्पॉट’ दूर करण्यासाठी राहुड घाटातील उड्डाणपूल/वायाडक्टच्या प्रस्तावास स्वतंत्र प्रकल्प म्हणून तातडीने प्रशासकीय मंजुरी द्यावी, ही नम्र विनंती मी यावेळी मंत्री महोदयांकडे केली.

यावेळी माझ्या समवेत, भाजपा तालुका अध्यक्ष श्री. मनोज शिंदे, चांदवडचे उपनगराध्यक्ष श्री. भूषण कासलीवाल, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. योगेश ढोमसे, अॅड. शांताराम भवर, श्री. देविदास आहेर, श्री. अनिल कोठुळे, श्री. राजू पाटील, श्री. गणेश महाले उपस्थित होते.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

Translate »