काजीसांगवीः उत्तम आवारे
दि. ६ एप्रिल २०२६ रोजी कै. एन. के. ठाकरे जनता विद्यालय, काजीसांगवी येथे वार्षिक विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे चांदवड तालुका संचालक सन्माननीय डॉ. सयाजीराव गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी विद्यालयाच्या गीतमंचाने सुंदर आवाजात ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री. जिभाऊ शिंदे सर यांनी करत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमात शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक तसेच विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे व संचालक यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके, प्रमाणपत्रे व शैक्षणिक साहित्य* देऊन गौरविण्यात आले.
डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या मनोगतात यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांनी मेहनत, शिस्त व चिकाटीच्या जोरावर यश संपादन करावे, असे मार्गदर्शन केले.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अँड. दौलतराव ठाकरे (माध्यमिक स्कूल कमिटी अध्यक्ष) होते. यावेळी श्री. बाबुराव पा. सोनवणे (उच्च माध्यमिक अध्यक्ष), श्री. पुंजाराम पा. ठाकरे , श्री. अभिजित ठाकरे (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस) , श्री. वाल्मीकराव पठाडे, श्री. विवेक ठाकरे, श्री. नागुजी सोनवणे, श्री. संजय ठाकरे, श्री. भरतजी मेचकूल, श्री. मंगेश मेचकूल तसेच संस्थेचे सन्माननीय सभासद व पर्यवेक्षक श्री. शिर्के एस. यु., सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कुंभार्डे एम. पी. यांनी प्रभावीपणे केले. आकर्षक फलकलेखन कलाशिक्षक श्री. ठाकरे पी. पी. यांनी केले. आभार प्रदर्शन सांस्कृतिक प्रमुख श्री. कोल्हे सर यांनी केले.
सर्व शालेय घटकांनी परिश्रमपूर्वक हा कार्यक्रम यशस्वी केला. एकूणच हा गुणगौरव सोहळा आनंददायी व प्रेरणादायी ठरला.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »