Banana Market : खानदेशात केळी दरात नरमाई

खानदेशात केळी दरात मागील दोन दिवसांत काहीशी नरमाई दिसत आहे. दर २५०० रुपये प्रतिक्विंटलवरून २३५० रुपये प्रतिक्विंटल व किमान १९०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.
Banana Market Khandesh जळगाव ः खानदेशात केळी दरात (Banana Rate) मागील दोन दिवसांत काहीशी नरमाई दिसत आहे. दर २५०० रुपये प्रतिक्विंटलवरून २३५० रुपये प्रतिक्विंटल व किमान १९०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.
स्थानिक बाजारातील केळीचे दर २५०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक होते. तसेच निर्यातीच्या केळीला मध्यंतरी ३२५० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. आता निर्यातीच्या केळीचे दरही २८०० ते २९०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.
केळीची परदेशात पाठवणूक वेगात सुरू आहे. पण स्थानिक बाजारात मागणी कमी झाली आहे. तसेच मध्य प्रदेश प्रदेश व गुजरातमधून केळीचा पुरवठा सुरू झाला आहे. परिणामी उत्तर भारतातील केळीची आवक वाढली आहे.
मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारात केळीला प्रतिक्विंटल २२०० ते ११०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. तेथे केळीची आवक मागील काही दिवसात वाढली असून, ती ८५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढी झाली आहे. खानदेशातही स्थानिक बाजारात केळीची आवक ९० ट्रक प्रतिदिन अशी झाली आहे.
परदेशात केळीची मागणी व पाठवणूक वेगात सुरू असल्याने स्थानिक बाजारातील दरात मोठी घसरण झालेली नाही. इतर राज्यांतूनही केळीचा पुरवठा सुरू झाल्याने स्थानिक बाजार किंवा उत्तर भारत, दिल्ली, पंजाब, काश्मिरात खानदेशातील केळीची मागणी कमी होत आहे, अशी माहिती मिळाली.
धन्यवाद
🙏🙏🙏

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »