चांदवड प्रतिनिधी
चांदवड : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तळेगाव रोही गट हा ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाला असून, या गटातून भारतीय जनता पार्टीच्या सक्षम आणि इच्छुक उमेदवार म्हणून डॉ. सौ. सुमन नितीन गांगुर्डे यांचे नाव चर्चेत आले आहे.
चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुलदादा आहेर आणि माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गांगुर्डे यांनी आपली दावेदारी सादर केली असून, परिसरातील दांडगा जनसंपर्क आणि सामाजिक कार्यामुळे त्यांच्या उमेदवारीला मोठी पसंती मिळताना दिसत आहे.
डॉ. नितीन गांगुर्डे आणि डॉ. सुमन गांगुर्डे हे गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. पक्षाने संधी दिल्यास आमदार राहुलदादा आहेर यांच्या नेतृत्वाखाली गटाचा कायापालट करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी त्यांनी तळेगांव रोही गटासाठी भविष्यातील आपण करणार असलेल्या कामांबद्दल सांगीतले यात महिला सक्षमीकरण: ओबीसी महिला राखीव जागेच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडणे.
पायाभूत सुविधा: रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत गरजांची प्रभावी पूर्तता करणे.
युवक व शिक्षण: बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि स्पर्धा परीक्षांसाठी अद्ययावत अभ्यासिकेची निर्मिती करणे.
आरोग्य सेवा: ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला माफक दरात दर्जेदार आरोग्य सेवा मिळवून देणे.
पक्षाकडे उमेदवारीची मागणी
”आमदार डॉ. राहुलदादा आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली विकासगंगा तळेगाव रोही गटातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत. पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला शिरसावंद्य असेल, मात्र जनसेवेची संधी मिळावी हाच उमेदवारी करण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी निक्षुण सांगितले
