कैलास सोनवणे दिघवद वार्ताहर:- सतत घसरत असलेल्या कांदा बाजारभावामुळे शेतकरी हवादिल झाला असून उत्पादन खर्च निघणे कठीण झाल्याने प्रहार संघटने कडून प्रांताधिकार्यांना निवेदन देऊन सतत कमी होणाऱ्या बाजारभावा संदर्भात आंदोलन छेडण्याचा इशारा सरकारला देण्यात आला.
अस्मानी संकटाशी संघर्ष करत मोठ्या मेहनतीने पिकवलेला कांदा आज बेभाव विकतोय.पण त्याबद्दल कोणत्याही राजकीय लोकांना पडलेल दिसत नाही. जगाचा पोशिंदा रोज मरतोय परंतु सत्तेवर असलेल्या लोकांना अजिबात वेळ नाही. अशी परिस्थिती आहे.तेंव्हा वेळीच निर्णय घेतला नाही तर शेतकरी म्हणून आम्ही सुद्धा येणाऱ्या जिल्हापरिषद निवडणूका लक्षात ठेवु अशी शेतकऱ्यांच्या मध्ये चर्चा सुरू आहे. कादां निर्यातीबाबतच्या चुकीच्या धोरणांचा फटका शेतकऱ्यांना बसत असून कांद्याचे भाव दिवसेंदिवस गडगडत असून शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरलेली आहे.कांद्याचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाल्याने शेतकरी वर्गामध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून कांदा निर्यात सुरू करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. ह्याच पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रांताधिकारी चांदवड यांना प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रहार चे तालुका प्रमुख प्रकाश चव्हाण, युवा तालुका प्रमुख चंद्रकांत रमण जाधव, गौरव पवार,अरुण शिंदे,रेवण गांगुर्डे, हरीभाऊ सोनवणे, अनिल झाल्टे, संतोष नवले, नामदेव पवार,रुपेश गायकवाड,व परीसरातील अनेक शेतकरी या वेळी उपस्थित होते,याची दखल तात्काळ घेतली गेली नाही तर प्रहार स्टाईल आंदोलन छेडले जाईल असा ईशारा या वेळी देण्यात आला.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »