जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, साळसाने येथे परमपूज्य भगरी बाबा आधार फाउंडेशन, लासलगाव यांच्या वतीने शाळेतील बालवाचनालयासाठी स्पोकन इंग्लिशची १०० पुस्तके देण्यात आली. त्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, पट्ट्या, रंग, खडू, स्केचपेन आदी शैक्षणिक साहित्याचे मुबलक प्रमाणात वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास लासलगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री. भास्कर शिंदे साहेब प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. हनुमान ठाकरे होते. फाउंडेशनचे संचालक समीर देवडे, अनंता सावंत, विशाल पालवे, अजेंद्र जाधव, कन्हैयालाल गोर, दशरथ पायमोडे, सोमनाथ उगलमुगले, त्र्यंबक उपाध्ये, शरद लोहकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. प्रताप ठाकरे, सरपंच अनिल ठाकरे, ग्रामविकास अधिकारी शितल गाडेकर, उपाध्यक्ष शांताराम ठाकरे, दिगंबर ठाकरे, नितीन ठाकरे, मंगेश ठाकरे, महेश ठाकरे, सोपान शिंदे तसेच अंगणवाडी सेविका प्रमिला ठाकरे यांची उपस्थिती लाभली.

शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने मदत करणारे किशोर बैरागी व प्रा. हनुमान ठाकरे यांनी या उपक्रमास विशेष पाठबळ दिले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक बाळू महाले, उपशिक्षक शक्तीदादा महाजन व महेंद्र पवार यांनी परिश्रम घेतले.

या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक काझीसांगवी केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र उबाळे, बिठाचे विस्तार अधिकारी श्री. खैरनार तसेच तालुक्याच्या सन्माननीय गटशिक्षणाधिकारी शितल तावडे यांनी केले आहे.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »