कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): चांदवड पंचायत समितीचे अभिनव उपक्रम

एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोजगार मेळावा

महिला समूहांना एकूण रक्कम १कोटी १८ लाख रुपये बँक कर्ज मंजूर व वाटप जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांच्या संकल्पनेतून पंचायत समिती चांदवड येथे एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी अभिनव उपक्रम राबवण्यात आला तालुक्यातील सामाजिक समतेचा आणि मानवी सन्मानाचा संदेश देणारा एकल महिला रोजगार मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. समाजातील विधवा,घटस्फोटीत परितक्त्या व एकल महिलाच सन्मान स्वावलंबन आणि सामाजिक न्याय व समानता मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला हा उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून तसेच मा. प्रकल्प संचालक श्रीमती प्रतिमा संगमनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात एक महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यावर भर देण्यात आला. मा. प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेर यांनी उमेद अभियान अंतर्गत बचत गटाकडून घेतले भांडवल समुदाय गुंतवणूक निधी बँक कर्ज वैयक्तिक कर्ज यासंदर्भात निधीचा वापर करून स्वयंरोजगार उभारावा येईल यावर मार्गदर्शन केले. "स्त्री ही कुटुंबाचा आधार असते, पण जेव्हा ती स्वतःचा आधार बनते, तेव्हा ती समाजाचे भविष्य घडवते." विधवा महिलांना समाजात एकटे पणाची जाणीव सतत सतावत असते त्यामुळे त्यांच्या मानसिक चिंता जनक असते कुटूबातील पाल्याची पालन पोषण शिक्षणाची जबाबदारी विधवा स्त्रिवर येते. कोणत्याही प्रगत समाजाची प्रगती ही त्या समाजातील महिलांच्या स्थितीवर अवलंबून असते. आपल्या समाजात 'एकल महिला' (विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता किंवा अविवाहित महिला) हा एक असा घटक आहे, जो अनेकदा सामाजिक आणि आर्थिक संघर्षाचा सामना करत असतो. या महिलांना केवळ सहानुभूतीची नाही, तर संधी आणि सन्मानाची गरज आहे.असे प्रतिपादन मा. प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक यांनी यया प्रसंगी केले . या कार्यक्रमात स्वयं सहायता बचत गटांना कर्ज रक्कमेचे धनादेश मा. आमदार श्री. डॉ. राहुलदादा आहेर, विधानसभा सदस्य चांदवड - देवळा विधानसभा मतदारसंघ यांच्या हस्ते करण्यात आले. बँक ऑफ महाराष्ट्र व HDCF बँक कडून ३७ समूहांना बँक कर्ज वाटप एकूण रक्कम १कोटी १८ लाख रुपये धनादेश वाटप करण्यात आले. महिला सक्षमीकरण व बचती मधून व्यवसाय वृद्धी व्हावी तसेच ग्रामीण भागातील महिलांना त्यांना पूरक असलेल्या लघु उद्योगाच्या मध्यमात्तून लखपती दीदी होण्यासाठी बचत गटांना धनादेश वितरीत करण्यात आले. तालुक्यातील वडनेरभैरव, गनुर , धोडगव्हान, खडकजांब, पाटे, वडाळीभोई,सोनीसांगवी, भाटगाव, रेडगाव, सालसाने, नांदूरटेक, सुतारखेडे, धोडांबे,वाकी खुर्द.दह्याने या गावातील ग्रामसंघना व बचत गटांना कर्जाचे धनादेश वितरीत मा. श्री. डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले या कार्यक्रमावेळी तसेच मा. गटविकास अधिकारी श्री.मच्छिंद्र साबळे साहेब व सहायक गटविकास अधिकारी श्री.थोरात साहेब, तालुका अभियान व्यवस्थापक श्री.प्रकाश बागुल उमेद कक्षातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. या वेळी एकल महिला विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता किंवा अविवाहित महिला व बचत गटातील अध्यक्ष सचिव महिला सदस्य उपस्थित होते तसेच भाजपा तालुका अध्यक्ष श्री. मनोज शिंदे ,भूषण कासलीवाल, गीताताई झाल्टे,नितीन गांगुर्डे, तालुका स्तरीय अधिकारी तसेच सरपंच पदाधिकारी सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »