काजीसांगवीः (उत्तम आवारे)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पन्हाळे ता . चांदवड येथे विद्यार्थ्यांना दुधाचे वाटप

जिल्हा परिषद प्राथमिक पन्हाळे येथील विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत सदस्य विठ्ठलपंत आवारे यांच्यातर्फे दुधाचे वाटप करण्यात आले .विद्यार्थ्यांना प्रत्येक शनिवारी दूध ,अंडी किंवा केळी अशा खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात येणार आहे .या नावीन्यपूर्ण आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या उपक्रमाची सुरुवात गावातील ग्रामपंचायतचे सदस्य विठ्ठल आवारे यांनी स्वतः स्वखर्चाने विद्यार्थ्यांना दूध वाटप करून केली .यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उत्तम आवारे शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य , शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते .सर्वांनी उपक्रमाचे कौतुक केले .विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे या हेतूने हा उपक्रम सुरू केल्याचे श्री विठ्ठल आवारे यांनी सांगितले .यानंतर प्रत्येक शनिवारी  ग्रामपंचायत सरपंच , उपसरपंच ,सर्व  सदस्य  ,व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,उपाध्यक्ष , सर्व सदस्य , विविध पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी  या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले .

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »