दिघवद गावातील विविध संस्थांमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

दिघवद गावातील विविध संस्थांमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
दिघवद (उत्तम आवरे)- आपल्या राष्ट्रीय सणांपैकी एक महत्त्वाचा राष्ट्रीय सण अर्थात प्रजासत्ताक दिन दिघवद गावातील शैक्षणिक, शासकीय तसेच सहकारी संस्थांमध्ये ध्वजारोहण तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी स्वामी विवेकानंद विद्यालयातील तसेच. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या घोषणा देत गावातून प्रभात फेरी काढली.या दरम्यान प्रथम दिघवद ग्रामपंचायत कार्यालय तसेच सहकारी सोसायटी कार्यालय या ठिकाणी ध्वजपूजन तसेच ध्वजारोहण करण्यात आले. दिघवद ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण नवनिर्वाचित सरपंच रावसाहेब गांगुर्डे यांचे हस्ते करण्यात आले तसेच दिघवद विविध कार्यकारी सोसायटीचे ध्वजारोहण नवनिर्वाचित चेअरमन पोपटराव गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत तसेच सहकारी सोसायटीचे सर्व आजी-माजी संचालक व पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर तलाठी कार्यालयाचे ध्वजारोहण मंडळ अधिकारी भैरवनाथ धायगुडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण अमर मापारी यांच्या हस्ते करण्यात आले. आणि शेवटी स्वामी विवेकानंद विद्यालयातील ध्वजपूजन चिटणीस अण्णासाहेब गांगुर्डे व ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ यांचे हस्ते करण्यात आले.तसेच स्काऊट ध्वजाचे ध्वजारोहण स्काऊट शिक्षक एस.जी. सोनवणे यांचे हस्ते करण्यातआले.कार्यक्रमाचे अध्यक्ष पुंडलिक साहेबराव गांगुर्डे होते.याप्रसंगी स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी संचलन केले तसेच विद्यालयातील विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतावर लेझीम नृत्य सादर केले.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक तुळशीराम पेंढारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शाळेतील शिक्षक सुनील गांगुर्डे यांनी प्रजासत्ताक दिन व संविधानाच महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. गावातील प्रतिष्ठित नागरिक नानाभाऊ बारगळ यांनी प्रजासत्ताक दिना विषयी आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर शाळेतील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन नैपुण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर गांगुर्डे यांनी केले.याप्रसंगी सैन्य दलातील आजी-माजी सैनिक,दिघवद गावातील विविध संस्थांचे शासकीय पदाधिकारी, दिघवद गाव आणि पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये साहेबराव गांगुर्डे नानासाहेब गांगुर्डे,विठ्ठल गांगुर्डे,सदाशिव गांगुर्डे,निवृत्ती मापारी,बनुबाई गागरे,राजीव पाटील,नानाभाऊ बारगळ,सरपंच रावसाहेब गांगुर्डे चेअरमन पोपटराव गांगुर्डे,उत्तमराव झाल्टे, सुनील गांगुर्डे,निवृत्ती गांगुर्डे, प्रकाश बंजारा,नारायण गांगुर्डे,अमर मापारी,दिपक गांगुर्डे,गणेश गांगुर्डे शाळेचे मुख्याध्यापक,पर्यवेक्षक शिक्षक,शिक्षिका
शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.