Search for:
  • Home/
  • कृषीन्यूज/
  • गोवा: अर्पोरा येथील आगीच्या दुर्घटनेत जीवितहानीबद्दल पंतप्रधानांचा शोक

गोवा: अर्पोरा येथील आगीच्या दुर्घटनेत जीवितहानीबद्दल पंतप्रधानांचा शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्पोरा, गोवा येथे लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांच्या प्रकृतीत लवकरात सुधारणा व्हावी, यासाठी त्यांनी प्रार्थना केली.

पंतप्रधानांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली असून राज्य सरकार प्रभावितांना सर्वतोपरी मदत पुरवत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी सोशल मिडियावर पोस्ट करताना म्हटले आहे, “गोवा, अर्पोरा येथील आगीची दुर्घटना अतिशय दु:खद आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्वांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी लवकर बरे होवोत.”

दुर्घटनेत मृत झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या निकटवर्तीयांना पीएमएनआरएफमधून ₹ 2 लाख अनुदान आणि जखमींना ₹ 50,000 अनुदान जाहीर करण्यात आले आहे.


स्रोत (Source): https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2199958&reg=1&lang=9

पत्रकार -

Leave A Comment

All fields marked with an asterisk (*) are required

Translate »