सोनीसांगवी येथे पाण्याच्या टँकरचे लोकार्पण.


कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)- सोनीसांगवी ग्रामपंचायतसाठी आमदार डॉ.राहुल आहेर यांचे विशेष प्रयत्नाने जिल्हा परिषद नाशिक ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांचेकडून नाविन्य पूर्ण योजनेतून पाच हजार लिटरचा पाण्याचा टँकर सोनीसांगवी ग्रामपंचायतसाठी मंजूर झाला असून टँकरचे लोकार्पण सरपंच सौ. अलका ठाकरे यांचे हस्ते तर टँकरचे पुजन श्री. बाळकृष्ण ठाकरे यांचे हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायतसाठी पाण्याचा टँकरची अत्यंत आवश्यकता असल्याने टँकरची आमदार डॉ. राहूल आहेर यांचेकडे मागणी केली होती. आता टँकर उपलब्ध झाल्याने पाणी वितरण करण्याची अडचण दुर झाली असुन ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी उपसरपंच प्रविण ठाकरे, मंगल ठाकरे, सुनीता पवार, भाऊसाहेब ठाकरे, अरूण ठाकरे, बबन ठाकरे, बंटी ठाकरे, तुकाराम ठाकरे, प्रभाकर ठाकरे, ज्ञानेश्वर ठाकरे, प्रविण घंगाळे,गोरख ठाकरे, दिपक ठाकरे, सागर शिंदे ,केशव ठाकरे, रवि शिंदे, लहानु घंगाळे, मोतीराम ठाकरे,अभिमन्यू ठाकरे, वसंत गांगुर्डे, महेंद्र घंगाळे, निवृती जगताप, म्हसु सोनवणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया
पिण्याच्या पाण्याचा टँकर आमदार राहुल आहेर यांनी दिल्याने गावाला पाणी वितरण वेळोवेळी करता येईल. यानिमित्ताने आमदार साहेबांचे आभार.
– प्रविण ठाकरे
उपसरपंच सोनीसांगवी

पत्रकार -

Translate »