कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार):चांदवड तालुक्यातील तिसगाव माळयाचे येथे सालाबादप्रमाणे भवानी माता यात्रा उत्सव संपन्न होत असते तशेंच परंपरागत भोवाडा आखाडी सात दिवस विविध प्रकारचे मुकुठधारी देविदेवतांचे विविध प्रकारचे पोशाख व सजावट करण्यात येते व विविध प्रकारचे अलंकार शोभिवंत लाईटिंग मुखवटयांना लावण्यात आले प्रथम भालदार चोपदार नंतर निमदेव नारदमुनी शारदा गणपती छंदीफेंदि चंद्रदेव कासव महादेव एकादशी महादेवनंदी मदण खंडेराव महाराज घोडा वेताळ विरभद्र टोप वराह राम लक्ष्मण सीता मारुती रावण भिमाचाटोप इंद्रजित नरसिंह नवनाथ महाराज म्हसोबा आदी देवी देवतांचे मुखवटधारी गावात वाजंत्री व फटाके फोडुन मिरविले जाते गावाच्या मध्यभागी हनुमान मंदिर परिसरात आल्या वर त्यांची पुजा व आरती केली जाते व श्रीफळ फोडून एकच जल्लोष करण्यात येतो या कार्यक्रमाला सर्व गावातिल लहान थोर आनंद घेतात व पहाटे भवानी मातेची मिरवणूक काढण्यात येऊन महाप्रसाद वाटण्यात येतो या कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास गांगुर्डे सागर माळी रविंद्र केदारे राजेंद्र गांगुर्डे दिपक गांगुर्डे सोमनाथ गांगुर्डे सरपंच सौ मिराबाई गांगुर्डे पोलिस पाटील सूनंदाबाई गांगुर्डे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अशोक गांगुर्डे शांताराम गांगुर्डे नवनाथ महाराज गांगुर्डे अँड भुषण गांगुर्डे व भवानी माता यात्रा कमिटी तरुण मित्र मंडळाणे परिश्रम घेतले

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »