मुख्याध्यापक एस. एम. मापारी यांना ‘आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’

दिघवद कैलास सोनवणे वार्ताहर: नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अँड नॉन टीचिंग एम्प्लॉई को-ऑपरेटिव्ह सोसायटी, नाशिक आयोजित गुणवंत विद्यार्थी व गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला सोसायटीचे चेअरमन श्री. शांताराम देवरे, सर्व संचालक मंडळ सदस्य तसेच मा. खासदार भास्कर भगरे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी एकूण ८५ गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांना पुरस्काराने गौरवण्यात आले.
यावेळी माध्यमिक विद्यालय वाकी बुद्रुक, तालुका चांदवड येथील मुख्याध्यापक एस. एम. मापारी सर यांना “आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार” प्रदान करण्यात आला. खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, महावस्त्र व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या गौरव सोहळ्याला मा. प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण, म्हाडा अध्यक्ष रंजन ठाकरे, सोसायटीचे चेअरमन शांताराम देवरे, व्हायस चेअरमन भारती पाटील, कार्यवाह निंबा कापडणीस, तालुका संचालक ज्ञानेश्वर ठाकरे, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
एस. एम. मापारी सर यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल पुण्यश्लोक देवी अहिल्या ग्रामविकास संस्थेचे संस्थापक शिरीषकुमार कोतवाल, मा. मीनाताई कोतवाल, अध्यक्ष राहुल कोतवाल, सचिव दत्तात्रय बारगळ, तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, शाळा समितीचे अध्यक्ष व स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.
