दिघवद विद्यालयाची दहावी निकालात यशाची परंपरा कायम.

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) -श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद विद्यालयाने इयत्ता दहावीच्या निकालातील यशाची परंपरा कायम ठेवलेली आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 97.84% लागलेला आहे.यामध्ये गुणांनुक्रमे प्रथम पाच विद्यार्थी पुढीलप्रमाणे 1)सुकन्या रसाळ -92%, 2)आदित्य हांडगे -91.60% 2)संकेत गांगुर्डे -91.60% 3)तनुष्का मापारी -88.20% 4)शितल ठोके-87.80% 5)कल्याणी नवले -87.40%
तसेच परीक्षेत प्रविष्ट असलेल्या 93 विद्यार्थ्यांपैकी विशेष प्राविण्य श्रेणीत -45 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत-34, द्वितीय श्रेणीत -11,पास श्रेणीत-1विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अतिशय कडक वातावरणामध्ये पार पडलेल्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षा आणि या परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे गुण म्हणजे शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी वर्षभर घेतलेल्या मेहनतीचे फळ आहे. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ,चिटणीस अण्णासाहेब गांगुर्डे शाळा समितीचे अध्यक्ष साहेबराव गांगुर्डे तसेच संस्थेचे सर्व विद्यमान संचालक,शाळेचे मुख्याध्यापक तुळशीराम पेंढारी, पर्यवेक्षक इंद्रभान देवरे, संचालक शिक्षक सदाशिव गांगुर्डे, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
