अखिल भारतीय जेष्ठ नागरिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): अखिल भारतीय जेष्ठ नागरीक संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अशोक नाना होळकर (FESCON नाशिक जिल्हा समन्वयक) यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेची महत्वपूर्ण बैठक आज उत्साहात पार पडली. या बैठकीत विविध सामाजिक उपक्रम, जेष्ठ नागरिकांसाठीच्या योजनांचे नियोजन आणि संघटन मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमाला विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) यांच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. सोनिताई होळकर यांनी जेष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावी भूमिका मांडली.
कार्यक्रमात नाशिक जिल्हा अध्यक्षा सौ. नलिनीताई शिंदे, नाशिक तालुका अध्यक्ष श्री. रामकृष्ण झाडे, तसेच नाशिक विभागीय सौ. वैशाली खैरे, सौ. सविता चतुर, सौ. सोनाली अमृतकर, सौ. पुष्पाताई जाधव, सौ. कौशल्या मुलाणे, श्री. सुभाष रायते, श्री. प्रकाश महाजन, श्री. कुलकर्णी, श्री. सुरेश गांगुर्डे, माधव रायते यांच्यासह इतर अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे, मार्गदर्शन शिबिरे, सन्मान सोहळे तसेच त्यांच्या हक्कांसाठी लढा देण्याच्या विविध उपक्रमांवर चर्चा झाली. संस्थेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या बैठकीमुळे नाशिक जिल्ह्यातील जेष्ठ नागरिक संघटनांचे कार्य अधिक वेगाने आणि संवेदनशीलतेने पुढे जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.



