उर्धुळ ग्रामपंचायतीला स्वर्गीय आर.आर. आबा पाटील स्वच्छ गांव सुंदर (स्मार्ट ग्राम) पुरस्कारात तालुका प्रथम क्रमांक
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)सन 2024/25 सालचा राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा स्वर्गीय आर आर आबा पाटील स्वच्छ गांव सुंदर (स्मार्ट ग्राम) पुरस्कार जिल्हा परिषदेच्या वतीने व चांदवड पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक उर्धुळ ग्रामपंचायत ला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ओमकार पवार साहेब उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ वर्षा पडोळ मॅडम चांदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री मच्छिंद्र साबळे साहेब यांच्या उपस्थितीत उर्धुळ गावच्या सरपंच सौ कविता श्रीहरी ठाकरे उपसरपंच सौ मिरा दत्तू ठाकरे ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती आम्रपाली देसाई यांना सुपूर्त करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत अधिकारी पापळ भाऊसाहेब ग्रामपंचायत सदस्य बापू ठाकरे श्रीहरी ठाकरे रामदास खुटे पोलिस पाटील पांडुरंग खुटे दत्तू मामा ठाकरे तंटामुक्ती अध्यक्ष रेवण लक्ष्मण ठाकरे प्रकाश पवार संदिप पवार स्वाती पाटील आनंदा ठाकरे गोरख ठाकरे रामनाथ सेठ जगताप कर्मचारी दत्तू खुटे तुषार आवारे विकास साबळे सौरभ पवार आदी उपस्थित उर्धुळ ग्रामपंचायत प्रथमच पारितोषिक मिळाल्याबद्दल गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले

