कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)

वर्ष 2023-24 मध्ये केलेल्या उल्लेखनीय कामकाजाबद्दल ग्रामपंचायत निंबाळेला देशपातळीवर गौरविण्यात आले आहे. ग्रामपंचायत विकास आराखडा, विविध योजनांची कार्यक्षमपणे व पारदर्शक अंमलबजावणी, आदर्श आपले सरकार सेवा केंद्र व त्याअंतर्गत दिल्या जाणाऱ्या विविध सेवा, तात्काळ तक्रार निवारण प्रणाली, स्थानिक अडचणींवर मात करत ग्रामपंचायतअंतर्गत राबविलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, शासनाचे डिजिटल इंडिया अभियानांतर्गत ग्रामपंचायतीने केलेले उल्लेखनीय कामकाज हे या यशामागील गमक आहे.

लोकाभिमुख, पारदर्शक, उत्तरदायी, स्वच्छ व कार्यक्षम प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना सुविधा देणे ही नेहमीच ग्रामपंचायतीची प्राथमिकता राहिली आहे.

प्रधान सचिव श्री.एकनाथ डवले , श्री.मल्लीनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ओमकार पवार, प्रकल्प संचालक श्रीमती प्रतिभा संगमनेरे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा फडोळ, गटविकास अधिकारी श्री. मच्छिन्द्र साबळे सर्वांचे अगदी सुरुवातीपासून मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
तसेच पंचायत समिती चांदवड सर्व विभाग प्रमुख, विस्तार अधिकारी, निंबाळे सरपंच व संपूर्ण ग्रामपंचायत कार्यकारिणी, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती शुभांगी सुरसे, कर्मचारी आणि सर्व निंबाळे ग्रामवासी यांच्या अविरत सहकार्याशिवाय हा टप्पा गाठने शक्य नव्हते.

ग्रामपंचायत निंबाळेला राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या पुरस्कारामुळे चांदवड तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीना नक्कीच प्रेरणा मिळणार आहे तसेच जिल्हा परिषद नाशिकचा दिल्लीत डंका वाजणार याचा अभिमान आहे.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »