कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) दिघवद ता चांदवड येथे सालाबादप्रमाणे आज पासून जगदंबा माता व खंडेराव महाराज यात्रेच आयोजन करण्यात आले आहे प्रथम जगदंबा मातेचा भव्य रथमिरवणुक करण्यात आली असुन घटस्थापना भक्त गण व गावातिल मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहेत तर रोज रात्री वाघेमंडाचे जागरण गोंधळाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक ५/रोजी रात्री नाना गायकवाड व पंढरी शिरसाट पार्टी याचें जागरण गोंधळाचे आयोजन करण्यात आले आहे तर ६रोजी रात्री भाग्यश्री मुरळी धोंडिराम जांभळे व़िजुसोनवणे पार्टी ७रोज रात्री मिराबाई चंदकांत कावळे पार्टी संभाजी नगरकर तर ८रोजी नवनाथ लहरे व सोपान गांगुर्डे भालुरकर ९रोज धनंजय धात्रक व कळू धोंडगे सह पार्टी यांचे जागरण गोंधळाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक ९ रोज सकाळी कावडी व काठी मिरवणुक होऊन सायंकाळी सहा वाजता बारा गाड्या योगेश वाल्मिक गांगुर्डे यांच्या हस्ते ओढण्यात येणार आहेत तर रात्री होम रहाडी तर पहाटे योगेश गांगुर्डे यांच्या हस्ते लंगर तोडण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तर दिनांक १०रोज सकाळी आरती व उतरपुजा करण्यात येणार आहे तर दिनांक ११रोजी रात्री कांतीलाल सोनवणेजळगावकर यांचा लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे तर बैलगाडी व कुस्ती दंगल वेळेवर यात्रा कमिटी ठरावणार आहे या यात्रेला दिघवद परिसरातील व दिघवद गावातिल जयमल्हार वाघे मंडळ व भजनी मंडळ शिवछत्रपती मंडळ जय बाबाजी मंडळ संत निरंकारी भक्त मंडळ स्वाध्याय परिवार सिध्देश्वर मंडळ एकलव्य मंडळ वदिघवद विशेष सहकार्य करणार आहे या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मात्रा कमेठीने केले आहे
