भोयेगावच्या आठवडे बाजारात विद्यार्थांनी थाटली दुकाने..
दिघवदः( कैलास सोनवणे)
कुणी भाजीपाला विक्रीसाठी आणला, तर कुणी खाद्यपदार्थ बनवून विकले…. कुणी स्टेशनरी माल तर कुणी खेळण्यांची दुकाने मांडली. वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ, वस्तू विक्रीसाठी मांडल्या होत्या. विद्यार्थी विक्रेते व खरेदीदार अशा दोन्ही भूमिकेत दिसत होते. अगदी इमिटेशन ज्वेलरीपासून जीवनावश्यक असणाऱ्या अनेक वस्तू विद्यार्थ्यांनी स्टॉलमध्ये मांडल्या आणि खरेदी-विक्रीच्या उत्साहाचा ‘आनंद बाजार’ रंगला तो भोयेगावच्या आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये..
विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शिक्षकांनी या विद्यार्थ्यांच्या स्टॉलवरील वस्तू खरेदी केल्या, विविध खाद्यपदार्थांचा,चहा-कॉफीचाही आस्वाद घेतला आणि या स्टॉलवाल्या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.
चांदवड तालुक्यातील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा भोयेगाव येथे आनंद बाजार हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या शेतातील भाजीपाला,फळभाज्या, पालेभाज्या आणून त्या गावातील शनिवारच्या आठवडी बाजारात मांडल्या. तसेच काही विद्यार्थ्यांनी होलसेल माल खरेदी करून त्यांचीही छोटी दुकाने बाजारात मांडली. विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर व्यावहारिक ज्ञान प्रत्यक्ष अनुभवता यावे, नफा-तोटा सारख्या गणिती संकल्पना स्पष्ट व्हाव्यात, स्व कमाई व स्वयंरोजगार याचे संस्कार व्हावेत, श्रमाचे महत्त्व शालेय वयातच कळावे, कष्ट करण्याची तयारी शालेय वयातच निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
उपस्थित गावकरी, पालक यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला. सदर आनंद बाजारास शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.जयश्री रामचंद्र बोरसे, उपाध्यक्ष श्री. संजय गलांडे तसेच सर्व सन्माननीय सदस्य, मा. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,माजी जि.प.सदस्य श्री.विलास माळी सर, केंद्रप्रमुख श्री. सर्जेराव ठोके सर, हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री.साहेबराव ठोंबरे सर, मुख्याध्यापक श्री ब्रम्हेश कदम सर, सहशिक्षक श्री.जयेश सुर्यवंशी, केशव वाकचौरे, चंद्रकांत वारूळे, सौ.सुनिता गवारे, श्रीम.सोनाली जाधव, श्रीम.अनिता जाधव ,श्रीम.सोनाली पाटील, सौ.शीतल अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले..