दिघवद  येथे चार ट्रॉली चारा जळून खाक

    दिघवद वार्ताहर (कैलास सोनवणे )

चांदवड तालुक्यातील दिघवद येथे कारभारी भागोजी गांगुर्डे गट नंबर ७३४(३) यांच्या शेतात जनावरांसाठी रचून ठेवलेला चारा पहाटे चार वाजेच्या दरम्यान विद्युत तारा एकमेकांना घासून त्याची ठिणगी पडून चार ट्रॉली चारा व पावसाळ्याचे दिवस असल्याने चारा झाकण्यासाठी टाकलेला प्लास्टिकचा कागद जळून खास झाला यावेळी कारभारी गांगुर्डे यांनी आरडाओरड केल्याने शेजारील शेतकरी प्रशांत मापारी भिकाजी गांगुर्डे राजेंद्र बारगळ अनिल शेळके नामदेव गांगुर्डे अण्णा मापारी यांनी माती व पाणी मारण्याचा प्रयत्न केला हवे मुळे चारा जळून खाक झाला यावेळी विहिरीत पिण्याच्या पाण्यासाठी असलेलं पाणी वाया गेले यावेळी दिघवद येथील तलाठी सौ, सोनाली सोनवणे यांनी पंचनामा केलाआसुन विस हजारांचा चारा जळाला आहेत यावेळी विहिरीत अशलेला पाणी गेले चालू वर्षी दुष्काळ असल्याने चारा मिळणे दुरापास्त झाले आहे पावसाळा सुरू झाला असला तरी विहिरी कोरड्या ठाक आहेत त्यामुळे दुष्काळात तेरावा महिना झाला अशे कारभारी गांगुर्डे यांनी सांगितले जनावरांसाठी चारा पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहेत यावेळी दिघवद तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बबनराव गाडे सोसायटीचे चेअरमन राजाराम मापारी अमर मापारी मोतिराम गांगुर्डे अनिल शेळके किशोर मापारी प्रशात मापारी निवृती गांगुर्डे नामदेव गांगुर्डे  राजाराम गांगुर्डे राजेंद्र बारगळ  रावसाहेब मापारी आणा गांगुर्डे अमोल गांगुर्डे सोपान शेळके आदी उपस्थित होते

पत्रकार -

Translate »