Weather Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २४) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे : राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २४) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तर कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत असून, उकाडा वाढत आहे. गुरुवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३६.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३१ ते ३५ अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानाचा पारा बहुतांश ठिकाणी १४ अंशांच्या पुढे कायम आहे.
रायलसिमापासून, दक्षिण छत्तीसगडपर्यंत समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच वाऱ्यांचे प्रवाह देखील खंडित झाल्याने पावसाला पोषक हवामान होत आहे.
आज (ता. २४) मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर येथे, तर मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर जिल्ह्यांत विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे
धन्यवाद
🙏🙏🙏

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »