काजीसांगवीत उद्या बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम

काजीसांगवीत उद्या बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम

काजीसांगवी Uttam Aware : गावचे ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज मंदिरात यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात विद्युत रोषणाई लावून मंदिरात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यात्रोत्सवाच्या काळात दररोज रात्री ९ ते १२ वाजेच्या दरम्यान विविध वाघे मंडळांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे. यात सोमवारी (दि. २) जय शिवमल्हार वाघे मंडळ भालुर, मंगळवारी (दि. ३) वाल्मिक पवार वाघे मंडळ दरसवाडी, बुधवारी (दि. ४) मंदाताई सोनवणे वाघे मंडळ कोपरगाव व गुरुवारी (दि. ५) भरत पालवे वाघे मंडळ मुरंबीकर यांनी जागरण गोंधळ केला आहे. तर शुक्रवारी (दि. ६) दगडू वाकचौरे वाघे मंडळ शरसगाव लौकीशिव यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे. शनिवार (दि. ७) रोजी शिव मल्हार पार्टी काजीसांगवी सकाळी नऊ वाजता काठी मिरवणूक काढणार असून सांयकाळी सहा वाजता बारागाड्याा ओढण्याचा कार्यक्रम योगेश सोनवणे यांच्या हस्ते होणार आहे.

Kaji Sangvi 2018 >>

पत्रकार -

Translate »