सोयाबिन पट्टा पेरणीचे फायदे
*सोयाबिन पट्टा पेरणीचे फायदे*
1) बियाण्याचे प्रमाणे कमी लागते (प्रति एकर 22 किलो बियाणे लागते.)
2) बियाणे खर्चात बचत होते. (आठ किलो बियाण्याचा खर्च वाचतो)
3) लागवड खर्चात बचत होते. (कमी वेळेत जास्त लागवड शक्य होते.)
4) शेतात मोकळी जागा निर्माण होते. (किडी, अळ्या व रोग यांचे निरीक्षण व नियंत्रण सुलभ होते.)
5) फवारणी सुलभ होते.
6) अळ्यांचा प्रादुर्भाव कमी (अळ्या एका पट्ट्यातून दुसऱ्या पट्ट्यात जाण्यासाठी नालीचा अडथळा असल्यामुळे त्यांचा प्रादुर्भाव कमीच राहतो.)
7) शेतात हवा खेळती राहते (बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.)
8) सूर्यप्रकाशाचा पुरेपूर उपयोग होतो. (प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेकरिता) सूर्यप्रकाश थेट जमिनीपर्यंत पोचण्यास मदत होते.
9) ओलित व्यवस्थापन करणे शक्य होते. (ओलिताची सोय असल्यास सरींच्या माध्यमातून पाटपाणी अथवा स्प्रिंकलरची सोय असल्यास सरीचा उपयोग स्प्रिंकलर पाइप टाकण्यासाठी होतो.)
10) बॉर्डर इफेक्ट मिळतो. (गादीवाफ्यावरील काठावरच्या दोन्ही ओळींना मुबलक हवा, अन्नद्रव्ये, पाणी व सूर्यप्रकाश मिळतो. या ओळीतील झाडांना पसरण्यासाठी मोकळी जागा मिळाल्यामुळे शेंगांचा लाग जास्त प्रमाणात असतो)
11) पावसाच्या पाण्याचे मूलस्थानी संवर्धन होते. (डवरणीपश्चात शेतात पडणारे पावसाचे पाणी सरीमध्ये साचते, मुरते व जिरते.) साहजिकच सोयाबीनच्या शेंगेमधील शेवटचा दाणा पक्व होईपर्यंत जमिनीतील ओल टिकून राहते. उत्पादनात मोठी वाढ शक्य होते.)
*पट्टा पद्धतीचे महत्त्व*
पट्टा पद्धतीने सोयाबीनची लागवड करताना प्रत्येक चौथी ओळ खाली ठेवावी लागते. म्हणजेच 25 टक्के ओळींची संख्या कमी होते. म्हणजे आपसूकच 25 टक्के झाडांची संख्या कमी होते. अशा प्रकारे प्रचलित पद्धतीने लागवड करताना राखल्या जाणाऱ्या 1,77,777 एवढ्या झाडांच्या संख्येऐवजी 1,33,333 एवढी संख्या पट्टा पद्धतीत ठेवली जाते. तरीही पट्टा पद्धतीच्या लागवडीतून उत्पादनात चांगली वाढ शक्य होते.
🙏🙏