ऊसतोड कामगारांना सतरंजी व ब्लँकेटचे वाटप : परम पूज्य भगरी बाबा आधार फाउंडेशनचा उपक्रम
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)
वेळापूर रोड परिसरातील ऊसतोड कामगारांच्या कठीण जीवनाचे भान ठेवून परम पूज्य भगरी बाबा आधार फाउंडेशन यांच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. ऊसतोड मजूर दिवसभर कष्टाची कामे करून रात्री थंडीमध्ये रस्त्यावरच थकलेल्या अवस्थेत झोपतात, अनेक वेळा योग्य पांघरूण नसल्याने त्यांची अडचण अधिक वाढते—याच परिस्थितीची जाणीव ठेवत फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी ऊसतोड मजुरांना भेट देऊन सतरंजी आणि ब्लॅंकेटचे वाटप केले.
या उपक्रमादरम्यान कामगारांच्या चेहऱ्यावर झळकलेले समाधानाचे आणि आनंदाचे हास्य पाहण्यासारखे होते. “आज रात्री कधी काम संपेल आणि कधी ब्लॅंकेटमध्ये झोपता येईल” अशी भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. ऊसतोड मजूरांच्या या मूलभूत गरजांची काळजी घेतल्याबद्दल परम पूज्य भगरी बाबा आधार फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे ऊसतोड कामगारांना आधार व उब मिळाल्याची भावना व्यक्त झाली आहे.
फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार.
