कृषिमंत्र्यांची घोषणा हवेतच. अद्याप शेतकऱ्यांना नवा पैसा नाही.
महेश शेटे. पाटोदा. :- वर्ष 2025-26 च्या खरीप हंगामासाठी खाजगी विमा कंपन्या शेतकऱ्यांना लवकर विमा अदा करत नाही असे आव आणत शासनाने शासनाची स्वतःची विमा कंपनी स्थापन केली खरी, परंतु एक रुपयाची विमा योजना बंद करून एक प्रकारे शासनाने शासनाला भांडवल उभारणी करणारी योजना या विमा कंपनीच्या माध्यमातून राबवली असे लक्षणे आता दिसू लागली आहेत. दरवर्षीच्या मानाने यंदा सरासरीपेक्षा दुपटीहून अधिक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही पिके काढणीला आलेच नाही तर काही हाताशी आलेले पिके शेतातच सडून गेले. पीक कापणी आधारित प्रयोगाची अंमलबजावणी करून शासनाने शेतकऱ्यांनी पिक विमा उतरवण्यासाठी शेतकरी हिस्सा पोटी भरलेली रक्कम लाटण्याचा प्रयत्न कायदेशीरपणे केलाच, परंतु आता जवळपास चार महिने उलटले तरी अद्याप पीक कापणी आधारित प्रयोगाच्या नियमात बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही नवा पैसा नियमानुसार वाटप करण्यात आलेला नाही.
येवला तालुक्यातून 2025 26 च्या खरीप हंगामासाठी 9 पिकांचा समावेश करण्यात आलेला होता. यांतर्गत 27,568 शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पिक विमा उतरवला. यामध्ये जवळपास 38 हजार 298.83 हेक्टर क्षेत्राचा समावेश होता. या अंतर्गत पिक विम्याचा शेतकरी हिस्सा म्हणून पूर्णतः शासनाच्या मालकीची असणाऱ्या भारतीय कृषी विमा कंपनीला तालुक्यातील शेतकऱ्यांनी जवळपास 1 कोटी 89 लाख 08 हजार 303.58 रुपये इतका हिस्सा अदा केला. आणि आपल्या पिकाचा 1अब्ज 74 कोटी 76 लाख 16 हजार 097.15 रुपयांचा पिक विमा उतरवला. शासनाने वेगवेगळ्या वेळेला केलेल्या घोषणा नुसार काही ठिकाणी शेतकऱ्यांना 50 टक्के लाभ मिळणे अपेक्षित होते, तर काही ठिकाणी पीक कापणी प्रयोग आधारित लाभ मिळणे आवश्यक होते. यावर्षी दीर्घकाळ चालेला पावसाळा आणि शेतांचे झालेले नुकसान पाहता पीक कापणी आधारित प्रयोग जरी राबवला गेला तरी जवळपास शेतकऱ्यांना किमान दहा टक्के दराने पिक विमा रक्कम भेटणे अपेक्षित होते. परंतु आज मितीस शेतकऱ्यांच्या खात्यात एक नवा पैसा ही जमा करण्यात आलेला नाही.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेमध्ये 6 फेब्रुवारी 2026 रोजी प्रश्नोत्तराच्या तासाला 77 नंबरच्या प्रश्नाला उत्तर देताना 21 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा केली जाईल. तसे न केल्यास विमा कंपन्यांकडून त्या रकमेवरती 12 टक्के व्याज दिले जाईल असे सांगितले असले तरी नियम हे फक्त शेतकऱ्यांसाठीच लागू असतात. विमा कंपन्यांना किंवा शासनाला कधीही नियमांचे पालन करणे अभिप्रेत नसते त्यांना कधी अंमलबजावणी करावयाचे नियम लावले जात नाही. कारण जवळपास कृषी मंत्र्यांच्या घोषणेला अठरा-विस दिवस उलटले असले तरी अद्याप एक नवा पैसाही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून शासन केवळ भांडवल उभारणी तर करत नाही ना असा प्रश्न शेतकऱ्यांना आता पडायला लागला आहे.
महत्त्वाचे.
तालुक्यासाठी नियुक्त करण्यात आलेली कंपनी :- भारतीय कृषी विमा कंपनी. पूर्णतः शासनाचे मालकीची.
पिक विमा मध्ये तालुक्यात समाविष्ट पिके :- 9
आपल्या पिकांचा विमा उतरवलेले शेतकरी :- 27,568
पिक विमा उतरवलेले क्षेत्र :- 38,298.83 हेक्टर
पिक विमा शेतकरी हिसापोटी शेतकऱ्यांनी भरणा केलेली रक्कम :- 1,89,08,303.58
शेतकऱ्यांनी काढलेले विम्याची रक्कम :- 1,74,76,16,097.15
तालुका :- येवला
पिके :- 9
पिकांचा विमा उतरवलेले शेतकरी :- 27,568
पिक विमा उतरवलेले क्षेत्र :- 38,298.83 हेक्टर
पिक विमा शेतकरी हिसापोटी शेतकऱ्यांनी भरणा केलेली रक्कम :- 1,89,08,303.58
शेतकऱ्यांनी काढलेले विम्याची रक्कम :- 1,74,76,16,097.15
तालुका:- बागलाण
पिक विमा योजनेत समाविष्ट पिके:- 12
पिक विमा उतरवलेले शेतकरी :- 32,573
पिक विमा उतरवलेले क्षेत्र :- 40,565.3
शेतकरी हिस्सापोटी भरणा केलेली रक्कम :-1,63,79,602.2
शेतकरी ने काढलेल्या विम्याची रक्कम :- 1,64,05,23,712.93
तालुका:- चांदवड
पिक विमा योजनेत समाविष्ट पिके:- 9
पिक विमा उतरवलेले शेतकरी :- 24,592
पिक विमा उतरवले क्षेत्र :- 31,870.83
शेतकरी हिस्सापोटी भरणा केलेली रक्कम :- 1,61,67,009.61
शेतकरी ने काढलेल्या विम्याची रक्कम :- 1,71,58,34,394.4
तालुका:- देवळा
पिक विमा योजनेत समाविष्ट पिके:- 5
पिक विमा उतरवलेले शेतकरी :-17,588
पिक विमा उतरवलेले क्षेत्र :- 21,824.53
शेतकरी हिस्सापोटी भरणा केलेली रक्कम :- 1,02,60,150.48
शेतकरी ने काढलेल्या विम्याची रक्कम :- 1,03,47,56,846.48
तालुका:- दिंडोरी
पिक विमा योजनेत समाविष्ट पिके:- 10
पिक विमा उतरवलेले शेतकरी :- 2,675
पिक विमा उतरवलेले क्षेत्र :- 2,770.7
शेतकरी हिस्सापोटी भरणा केलेली रक्कम :- 17,53,927.46
शेतकरी ने काढलेल्या विम्याची रक्कम :- 14,41,11,220.81
तालुका:- इगतपुरी
पिक विमा योजनेत समाविष्ट पिके:-6
पिक विमा उतरवलेले शेतकरी :-13,609
पिक विमा उतरवलेले क्षेत्र :-17,267.5
शेतकरी हिस्सापोटी भरणा केलेली रक्कम :-93,51,390.67
शेतकरी ने काढलेल्या विम्याची रक्कम :-93,77,12,685.4
तालुका:- कळवण
पिक विमा योजनेत समाविष्ट पिके:-7
पिक विमा उतरवलेले शेतकरी :-2933
पिक विमा उतरवलेले क्षेत्र :- 4071.86
शेतकरी हिस्सापोटी भरणा केलेली रक्कम :-18,24,114.46
शेतकरी ने काढलेल्या विम्याची रक्कम :-17,29,42,420.26
तालुका:- मालेगाव
पिक विमा योजनेत समाविष्ट पिके:- 14
पिक विमा उतरवलेले शेतकरी :-50,588
पिक विमा उतरवलेले क्षेत्र :-61,317.69
शेतकरी हिस्सापोटी भरणा केलेली रक्कम :-2,73,46,423.95
शेतकरी ने काढलेल्या विम्याची रक्कम :-2,75,88,86,920.74
तालुका:- नांदगाव
पिक विमा योजनेत समाविष्ट पिके:-8
पिक विमा उतरवलेले शेतकरी :- 27,076
पिक विमा उतरवलेले क्षेत्र :- 40,234.8
शेतकरी हिस्सापोटी भरणा केलेली रक्कम :- 1,73,54,821.57
शेतकरी ने काढलेल्या विम्याची रक्कम :-1,77,38,86,533. 12
तालुका:- नाशिक
पिक विमा योजनेत समाविष्ट पिके:-10
पिक विमा उतरवलेले शेतकरी :-2,425
पिक विमा उतरवलेले क्षेत्र :- 2,214.91
शेतकरी हिस्सापोटी भरणा केलेली रक्कम :-16,34,320,92
शेतकरी ने काढलेल्या विम्याची रक्कम :-12,19,63,556.29
तालुका:- निफाड
पिक विमा योजनेत समाविष्ट पिके:-12
पिक विमा उतरवलेले शेतकरी :-14,407
पिक विमा उतरवलेले क्षेत्र :-15,851.45
शेतकरी हिस्सापोटी भरणा केलेली रक्कम :-1,02,90,509.36
शेतकरी ने काढलेल्या विम्याची रक्कम :-76,43,38,592.95
तालुका:- पेठ
पिक विमा योजनेत समाविष्ट पिके:-5
पिक विमा उतरवलेले शेतकरी :-5167
पिक विमा उतरवलेले क्षेत्र :- 4,798.74
शेतकरी हिस्सापोटी भरणा केलेली रक्कम :- 25,49,880
शेतकरी ने काढलेल्या विम्याची रक्कम :-25,77,74,578.97
तालुका:- सिन्नर
पिक विमा योजनेत समाविष्ट पिके:-13
पिक विमा उतरवलेले शेतकरी :-16,678
पिक विमा उतरवलेले क्षेत्र :-20,402.3
शेतकरी हिस्सापोटी भरणा केलेली रक्कम :-1,31,00,002.58
शेतकरी ने काढलेल्या विम्याची रक्कम :-1,01,35,158.64
तालुका:- त्र्यंबकेश्वर
पिक विमा योजनेत समाविष्ट पिके:-6
पिक विमा उतरवलेले शेतकरी :-4,737
पिक विमा उतरवलेले क्षेत्र :-4,273.31
शेतकरी हिस्सापोटी भरणा केलेली रक्कम :- 22,07,580.55
शेतकरी ने काढलेल्या विम्याची रक्कम :- 22,53,18,501.86
तालुका:- सुरगाणा
पिक विमा योजनेत समाविष्ट पिके:- 7
पिक विमा उतरवलेले शेतकरी :- 6,602
पिक विमा उतरवलेले क्षेत्र :- 6,566.28
शेतकरी हिस्सापोटी भरणा केलेली रक्कम :-35,41,663.96
शेतकरी ने काढलेल्या विम्याची रक्कम :-35,57,34,158.64
महाराष्ट्र-34 जिल्हे
45 लाख 56 हजार 207 शेतकरी
6,066.53 हजार हेक्टर क्षेत्र
55,066.33 लाख शेतकऱ्यांचा हिस्सा.
32,57,334.71 लाख रुपयांचा विमा उतरवला गेला.