सरपंचपदाची निवडणूक हरले, आज थेट मुख्यमंत्री; कोण आहेत भजनलाल शर्मा?
Rajasthan New CM : राजस्थानला अखेर नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. भाजपाने नऊ दिवस विचारमंथन केल्यानंतर पहिल्यांदाच निवडून आलेल्या भजनलाल शर्मा यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली. विशेष म्हणजे ही निवड करताना भाजपाने काळजीपूर्वक जातीय गणिते सांभाळली आहेत. भजनलाल शर्मा ब्राह्मण आहेत. तर त्यांच्या जोडीला दोन उपमुख्यमंत्री देण्यात येत आहेत. त्यापैकी दिया कुमारी [...]