श्रीराम विद्यालय रायपुर येथे रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
श्रीराम विद्यालय रायपुर येथे रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
काजीसांगवीः(उत्तम आवारे) दिः २९: श्रीराम विद्यालय रायपुर येथे आज रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. गांगुर्डे आर. के. सर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. विद्यालयातील विद्यार्थिनींनी झाडांना ओवाळून झाडांना राख्या बांधल्या. राख्या बांधून एक प्रकारे झाडे न तोडण्याचा संकल्पच केला. त्यानंतर विद्यार्थिनींनी शाळेतील विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या. अशाप्रकारे अतिशय उत्साहात विद्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. गांगुर्डे आर. के. सर, सर्व शिक्षक ,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना उपस्थित होते.
आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पगार डी. डी. सर यांनी केले.