पुणे गाव कालव्याच्या पाण्यावर निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांचा डल्ला

पुणे गाव कालव्याच्या पाण्यावर निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांचा डल्ला

काजीसांगवी(दशरथ ठोंबरे ):— पुणे गाव धरण पूर्ण भरले असुन चांदवड तालुकयाच्या मागणी नुसता दरसवाडी धरण भरण्यासाठी ओव्हर फ्लो चे पाणी पूर्ण क्षमतेने पुणे गाव कालव्याद्वारे 43किलोमीटर पर्यत पुर्ण वहन क्षमतेने सोडण्यात आले असून या पाण्यावर निफाड तालुक्यातील रेडगाव शिवारातील शेतकऱ्यांनी कालव्यात डोंगरे टाकून पाण्यावर डल्ला मारला. त्यामुळे हे पाणी पुढे सरकत नसल्याने चांदवड तालुक्यातील संघर्ष समिती पदाधिकारी व शेतकरी कालव्यावर जाऊन आक्रमक झाले आहे.

यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून त्यांना चांगले धारेवर धरले व कालव्यात डोंगळे टाकणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली . चांदवड तालुक्यात सद्यस्थितीला दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होत असुन .त्यात पुणेगाव धरण हे पुर्ण पणे भरल्याने याधरणातील ओव्हरफ्लोचे पाणी पुनेगाव दरसवाडी कालव्या द्वावारे दरसवाडी धरणात सोडावे अशी मागणी असताना दि.6 सप्टेंबर रोजी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले. परंतु पुढे निफाड तालुकयातील रेडगाव शिवारातील शेतकरयानी या कालव्याचे पाणी डोंगळयाद्वारे पाणी चोरीचा प्रकार चालू केला. त्यामुळे पुढे पाणी येण्यास मोठा अडथळा निर्माण झाला ही बाब चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर चांदवड तालुक्यातील प्रहारचे जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन आहेर, बाजार समीतीचे सभापती संजय जाधव उपसभापति कारभारी आहेर संघर्ष समितीचे अध्यक्ष तुकाराम सोनवणे पदाधिकारी व शेतकरी यांनी गुरुवारी दि. 14 रोजी सकाळी दहा वाजता 14 नंबर चारी वर एकत्र येऊन पाहणी केली .यावेळी पाटबंधारे विभागाच्या श्रीमती घुगे व चौधरी उपस्थित अधिकारयाना जाब विचारला.

यावेळी रेडगाव शिवारातील शेतकरी आक्रमण होऊन पाण्यावर आमचा हक्क असल्याचे सांगितले तर संघर्ष समितीच्या म्हणण्यानुसार रेडगाव शिवारातील फक्त पिण्याच्या पाण्याच्या वर्तन आहे. ते दोन रोटेशन मध्ये दिले जाते पुणेगाव ते दरसवाडी पूर पाणी शेतीसिंचनासाठी देण्याचे नियोजन नसल्याचे सांगितले .यावर दोन्ही बाजूंच्या पदाधिकारी व शेतकरयामध्ये वाद पेटला .यावेळी काही शेतकऱ्यांनी कालव्यातील डोंगळे काढण्याची मागणी केली जोपर्यंत पाणी चोरी थांबत नाही तोपर्यंतआम्ही उठणार नाही अशी भूमिका घेतली चांदवड तालुकयातील शेतकरयानी घेतली यावर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटला .त्यांनी वडनेर भैरव व पिंपळगाव बंसवत पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले .त्यामुळे आणखीनच तणाव निर्माण झाला.

अखेर कालव्याचे डोंगळे काढण्याचा निर्णय घेण्यात येऊन. जेसीपी द्वारे कालव्यातील डोंगळे काढून काही ठिकाणी खोदून ठेवलेले चारी देखील बुजवण्यात आल्या . त्यामुळे पुणेगावचे कालव्याचे पाणी पुढे सरकले दरम्यान पाण्याची वारंवार चोरी करणारे करणाऱ्या विरुद्ध पाटबंधारे खात्याने कारवाई करावी अशी मागणी संघ संघर्ष समितीने केली असून पूर पाणी सुरू असेपर्यंत कालव्यावर पहारा ठेवण्यात यावा असा आग्रही धरला. प्रतिक्रया :–चांदवड तालुक्यात सद्यस्थितीला दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्यामुळे पुणेगाव पाण्याची मागणी केली. हे पाणी मागणीनुसार कालव्याद्वावारे सोडण्यात आले परंतु निफाड तालुकयातील काही शेतकरी कालव्यातुन अधिकाऱ्यांच्या समक्ष पाणी चोरी करता तरी आधिकारी गप्प का? त्यांच्यावर कारवाई का करु शकत नाही पाणी चोरी करणारयाना आधिकारयाचा आशिर्वाद आहे. म्हणून पाणी चांदवड तालुकयात येत नाही. चांदवडचा शेतकरी पाण्यासाठी आजही संघर्ष करतो. यासाठीशेतरयाना घेऊन मोठे

आदोंलन उभे करावे लागेल. :

गणेश निंबाळकर (जिल्हा प्रमुख प्रहार शेतकरी संघटना ) प्रत्येक वेळेस पुनेगाव कालव्याच्या पाण्याच्या आश्वासनवर जगतो आम्ही पाणी सोडल्यावर पाण्याचा फायदा निफाड तालुकयातील शेतकरी घेतात आधिकरयाकडे तक्रार करुनही कारवाई होत नाही.

तसेच दुरुस्तीचे कामही योग्य पध्दतीने होत नाही त्यामुळे आम्हाला पुरेशे पाणी मिळत नाही .:–मच्छिंद्र ठोंबरे(परसुल शेतकरी)

पत्रकार -

Translate »