दिघवद येथे मराठा आरक्षण मिळे पर्यंत राजकीय पुढारी व नेत्यांना प्रवेश बंदी…!

दिघवद (वार्ताहर) : मराठा आरक्षण मिळे पर्यंत राजकीय पुढारी व नेत्यांना दिघवद गावामधे गावबंदी बाबत ठराव करण्यात आला सरपंच उपसरपंच व सदस्य व गावातील विविध आजी माजी संचालक मंडळ व मराठा बांधवांनी निवेदनावर सह्या केल्या आहेत तर निवेदनात मराठा आरक्षण प्रश्न निर्माण झाला आसुन सगळेच पक्ष व राजकीय नेते या प्रश्नाकडे प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे करत आहे.

राजकीय नेते कोणतीही स्पष्ट भुमिका घेतांना दिसत नाही त्यामुळे दिघवद येथील ग्रामस्थांनी व तरुणांनी जो पर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांनी व पक्षांना सभा व गावात प्रवेश दिला जाणार नाही असे निवेदन चांदवड तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार व्हि ,बी कच्छवे यांना देण्यात आले.

यावेळी बाळासाहेब गाडे सोसायटी चे सभापती नारायण गांगुर्डे शरद गांगुर्डे सागर गांगुर्डे अमर मापारी इंद्राभान गांगुर्डे भानुदास गांगुर्डे सुनील मापारी वैभव गांगुर्डे मंगेश गांगुर्डे सदाशिव जेऊघाले प्रताप गांगुर्डे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

पत्रकार -

Translate »