चांदवड येथे महाराष्ट्र बंदला प्रतिसाद

काजी सांगवी भरत मेचकुल( वार्ताहर ) : आज संपूर्ण राज्यामध्ये मराठा आरक्षणासाठी बंद पुकारला गेला असल्याने चांदवड तालुका तसेच शहरांमध्ये बंद पुकारण्यात आला आहे याप्रसंगी सर्व व्यापारी बांधव कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी व्यापारी सर्व विविध संघटनेचे पदाधिकारी आदींनी संपामध्ये सहभाग घेतला आहे ग्रामीण भागामध्ये सुद्धा बंद बंदला शाळा महाविद्यालय तसेच अत्यावश्यक सुविधा सोडल्या सर्व ठिकाणी बंद ठेवण्यात आले आहे जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील मराठा बांधवांनी चांदवड शहरातून रॅली काढून एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशाप्रकारे घोषणा देण्यात आल्या तसेच थोड्या वेळासाठी रास्ता रोको करून रस्त्यावर टायर जाण्यात आले याप्रसंगी कोणालाही कुठल्याही त्रास होणार नाही यासाठी मराठी बांधवांनी काळजी घेतली तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेस ला मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्या फोटोला काळे फासण्यात आले

पत्रकार -

Translate »