काजिसांगवी व पंचक्रोशीत कडकडीत बंद !!

काजीसांगवी (दशरथ ठोंबरे) :-चांदवड तालुक्यातील ग्रामीण भागात ठिकठिकाणी दि 31रोजी मराठा समाज आरक्षण मिळण्यासाठी “एक मराठा लाख मराठा “”आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे”अशा घोषणा देत ग्रामीण भागातील जनतेने कडकडीत बंद पाळलासकल मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून मी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्व राजकीय पक्षांतील नेत्यांना व सचिवांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली असून असे फलक ही गावागावात लावण्यात आले आहे. तसेच काजीसांगवी येथिल दि 31रोजी सकाळी मराठा समाज बांधवानी आरक्षणावर घोषणा देत गाव बंद हाक देत निषेध केला. व्यवसायकानी कडकडीत बंद पाळत आदोलनात सामील झाले. याबाबतचा सरपंच कल्पना ठाकरे व सदस्य यांनी ठराव करुन याबाबचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. शांततेच्या मार्गाने आंदोलन करुन मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्या प्रमाणे काजीसांगवी गावात राजकिय नेत्याना गाव बंद करण्यात आले आहे. तसेच कोलटेक फाटा येथे भागवत ठोके, इस्माईल शेख ,दादा ठोके, यासीन शेख ,पवन ठोके ,संजय निंबाळकर ,सोमा आरगडे, दगा ठोके, शंकर खांगाळ, हेमराज चव्हाण ,पिंटू ठोके ,विकास शिंदे ,योगेश ठोके, विलास गोधडे ,मंगेश चव्हाण, नवीन ठोके ,योगेश खंगाळ, गुणवंत ठोके, हर्षद आहेर ,दादा भुतनार, नवनाथ ठोके, संदीप गवळी, संदीप जाधव, बाळू खांगाळ ,अशोक कासव, संदीप गावडे ,संजय ठोके ,सुभाष खांगाळॆआदि ग्रामस्थानी एकत्र येऊन विंचूर प्रकाशा रोड वरती “एक मराठा लाख मराठा ” ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे ‘ “जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है “अशा घोषणा देत टायर जळत काही काळ आंदोलन केले निषेध केला. तसेच तळेगावरोहीसह गटातील साळसाणे, दिघवद, पिपंळद, , काळखोडे, वाकी, वाहेगावसाळ, वाळकेवाडीफाटा, निंबाळे, विटावे ,गंगावे, हिवरखेडे,साळसाणे, वागदर्डी, आदी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.

पत्रकार -

Translate »