चांदवड तालुक्यात गारांचा पाऊस

काजीसांगवीः(उत्तम आवारे) वडगाव पंगुत रायपूर साळसाने वाकी बु वाकी खु काळखोडे तळेगाव रुई विटावे अनेक भागांमध्ये गारांसह पाऊस झाला मोठ्या

प्रमाणामध्ये द्राक्ष बागांचे व कांदा पिकाचे नुकसान झाले आणि पूर्व भागाची गाव तालुका फार मोठ नुकसान गारांचा पाऊस धो धो पडला आणि थोडे फार चांगले असणारे कांदे आणि इतर पीक यांचं मोठ नुकसान झाले आहे सर्व शेतकरी यांनी ज्यांचे थोड चांगले असणारे पीक नुकसान झाले असेल ज्यांनी गहू हरभरा अजून इतर पीक ज्यांनी कांदा पिकाची पीक विमा भरला आहे त्यांनी विमा कंपनीला तक्रार करावी शेतकरी फार मोठ्या संकटात सापडलेल्या अवस्थेत आहे .पीक विमा पावती आपले कडे असणे गरजेचे आहे अजून कोणाचे नुकसान असेल तर व्हॉट्सॲप वर पाठवा तहसीलदार साहेब यांना रिपोर्ट करणे आहे सर्व शेतकरी यांनी कांदा पिकाचे पीक विमा नुकसान तक्रार मात्र लवकर करावी ही विनंती कांदे काहीच राहिले नाही चांदवड तालुका पूर्ण गारा पाऊसाने झोडपलं गेला आहे आणि भयंकर नुकसान झाले आहे तलाठी तात्या आणि कृषी विभागाने तत्काळ पाहणी करावी ही पूर्व भागाची जोरदार मागणी आहे आता 25% पीक विमा तर आहे पण जी कांदे पीक आणि इतर पिकांचे पण पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी कांदे आणि इतर भाजी पाला मिरची आणि जनावरांचा चारा भुईसपाट झाला आहे तत्काळ प्रशासनाने लोकप्रतिनिधीही लक्ष द्यावे पोल्ट्री चे कतरवांडी येथील सागर गोजरे यांची भित कोसळली पूर्व भागात ज्यांचे गायी बाहेर होत्या त्यांना मोठे मोठे फोड आले आहे आपल्या विभागात जे जनावरांचे डॉक्टर आहे त्यांनी लगेच दिरंगाई न करता गाईना उपचार द्यावेत

पत्रकार -

Translate »