काय आहे किसान क्रेडिट कार्ड योजना
किसान क्रेडिट कार्ड योजनेचा काय लाभ आहे
- पैशाच्या वाटपाच्या पध्दती सोप्या करते
- नगद आणि स्वरूपासंबंधी कठिणपणा काढून टाकते
- प्रत्येक पिकासाठी कर्जाकरीता अर्ज करण्याची गरज नाही
- शेतकरयासाठी व्याजाचा भार कमी करणे शक्य करीत कोणत्या ही वेळी खात्रीलायकपणे कर्ज मिळण्याची हमी
- शेतकरयाच्या सवडी आणि निवडीप्रमाणे बियाणे, उर्वरके खरेदी करण्यास मदत करते
- डीलर्स कडून कॅश अव्हेल डिस्काउंट (नगद लाभ सूट) वर खरेदी करण्यास मदत करते
- वर्षांपर्यंत कर्जाची सुविधा – हंगामी मूल्यांकनाची गरज नाही
- जास्तीत जास्त कर्जाची मर्यादा (सीमा) शेतीच्या उत्पन्नावर आधारित
- किती वेळा पैसे काढू शकता ती संख्या कर्ज सीमेवर अवलंबून
- परतफेड फक्त हंगामा नंतर
- शेतीसाठी घेतलेल्या आगावू रकमेवर व्याज दर लागू असल्याप्रमाणे
- जामीन, मार्जिन व दस्तऐवजांचे मानक शेतीसाठी घेतलेल्या आगावू रकमेवर लागू असल्याप्रमाणे
किसान क्रेडिट कार्ड कसे मिळवावे
- आपल्या नजीकच्या पब्लिक सेक्टर बँकेस भेट द्या आणि तपशील मिळवा
- पात्र असलेल्या शेतकरयांना किसान क्रेडिट कार्ड आणि एक पासबुक मिळेल. त्यामध्ये नांव, पत्ता, जमिनीच्या मालकीचे (स्वामित्वाचे) विवरण, कर्ज घेण्याची सीमा, कायदेशीर मान्यता काळ, धारकाचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो ज्याचा उपयोग ओळख पत्र आणि नेहमीच्या व्यवहाराची नोंद करण्याची सोय असे दोन्ही हेतू साध्य करण्यासाठी करण्यात येईल.
- हे पासबुकवजा कार्ड धारकाने दाखवावे जेव्हां ती/तो खात्याचे संचालन करील.
भारतातील अग्रगण्य बँकांची किसान क्रेडिट कार्डस्
अलाहाबाद बँक – किसान क्रेडिट कार्ड (केसीसी)
आन्ध्र बँक – एबी किसान ग्रीन कार्ड
बँक ऑफ बडोदा – बीकेसीसी (बीकेसीसी)
बँक ऑफ इंडिया – किसान समाधान कार्ड
कॅनरा बँक – केसीसी
कॉरपोरेशन बँक – केसीसी
देना बँक – किसान गोल्ड क्रेडिट कार्ड
ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स – ओरिएन्टल ग्रीन कार्ड (ओजीसी)
पंजाब नॅशनल बँक – पीएनबी कृषि कार्ड
स्टेट बँक ऑफ हैदराबाद – केसीसी
स्टेट बँक ऑफ इंडिया – केसीसी
सिंडिकेट बँक – एसकेसीसी
विजया बँक – विजया किसान कार्ड
स्त्रोत: पोर्टल कंटेंट टीम