Weather Update : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम
Weather Update : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम
राज्याच्या विविध भागात वादळी वारे, पाऊस, गारपिटीने हजेरी लावल्याने कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहे. आज (ता. १) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
Weather Update Pune राज्याच्या विविध भागात वादळी वारे, पाऊस, गारपिटीने (Hailstorm) हजेरी लावल्याने कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहे. आज (ता. १) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे.
उर्वरित राज्यातही हलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पावसाची हजेरी, ढगाळ हवामानामुळे गेले काही दिवस राज्याच्या कमाल तापमानात घट झाली आहे. उन्हाच्या झळा आणि उकाडा अनुभवायला मिळत असल्या तरी, कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांवर आला आहे.
रविवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३२ ते ३७ अंशांच्या दरम्यान आहे. तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता आहे.
दक्षिण अरबी समुद्रातील मालदीव बेटांजवळ समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. पूर्व विदर्भापासून, तेलंगणा, कर्नाटक, अंतर्गत तामिळनाडू पर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडीत वाऱ्यांची स्थिती कायम आहे.
आज (ता. १) विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांसह जोरदार पावसाचा इशारा आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏