Raisin Market Rate : बेदाण्याचे दर टिकून
Raisin Market Rate : बेदाण्याचे दर टिकून
यंदाच्या हंगामात बेदाण्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. सध्या बेदाण्याला मागणी कमी आहे. यामुळे गेल्या महिन्यात बेदाण्याचे दर प्रतिकिलोस पाच ते दहा रुपयांनी कमी झाले आहेत.
Raisin Market Rate यंदाच्या हंगामात बेदाण्याचे विक्रमी उत्पादन (Raisin Production) झाले आहे. सध्या बेदाण्याला मागणी कमी आहे. यामुळे गेल्या महिन्यात बेदाण्याचे दर (Raisin Rate) प्रतिकिलोस पाच ते दहा रुपयांनी कमी झाले आहेत.
मात्र गेल्या आठवड्यात प्रतिकिलोस प्रतवारीनुसार ९० रुपयांपासून १६० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. सध्या हे दर टिकून आहेत. सध्या बेदाण्याच्या दरात फारशी तेजी येण्याची शक्यता नसल्याचा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
बेदाण्याला वर्षभर मागणी असते. सण, समारंभाच्या दरम्यान बेदाण्याची मागणी वाढते. त्यानुसार बेदाणा उत्पादक त्याच्या विक्रीचे नियोजन करतो. मुळात बेदाणा निर्मितीचा यंदा हंगाम उशिरा सुरू झाला.
सुरुवातीपासून पोषक वातावरण असल्याने बेदाणा निर्मितीस अडथळा आला नाही. मात्र हंगाम अंतिम टप्प्यात असताना वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे बेदाण्याचे नुकसान झाले.
राज्यामधील बेदाणा हंगाम निर्मितीचा काळ संपला असून सुमारे २ लाख ५० हजार टन इतके उत्पादन होण्याची शक्यता आहे अर्थात गतवर्षीपेक्षा यंदा ५० ते ६० हजार टन वाढेल. हंगामाच्या सुरुवातीपासून बाजारपेठेत बेदाण्याची मागणी कमी-अधिक होत होती. त्यामुळे दरात चढ-उतार पाहायला मिळाले.
धन्यवाद
🙏🙏🙏