Mini Tractor : वर्ध्याच्या योगेश लिचडे यांनी छोट्या शेतकऱ्यांसाठी बनवला मिनी ट्रॅक्टर, पॉवर वीडर

वर्धा जिल्ह्यातील कासारखेड (आर्वी) येथील शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण असलेल्या योगेश लिचडे यांनी अनेक छोटीमोठी यंत्रे विकसित केली आहेत. त्यातून शेतकऱ्यांचे श्रम, पैसा आणि वेळेची बचत होत आहे.
Indian Agriculture : शेती कामांसाठी मजुरांची उपलब्धता ही मोठी समस्या झाली आहे. त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आपापल्या पातळीवर शेतकरी करत आहेत. त्यात त्यांना यंत्रे, अवजारे उपयोगी ठरत असली तरी त्यांच्या किमतीमुळे अनेकवेळा ती लहान शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरही राहत आहेत.
त्याच्या उलट परदेशामध्ये विविध कामांसाठी अधिक क्षमतेची यंत्रे (machines) वापरली जातात. त्यासाठी अधिक इंधन लागत असले तरी वेगाने काम होत असल्याने मोठे अनेक शेतकरी त्याकडे वळत आहेत.
हाच धागा पकडत कासारखेड (आर्वी) येथील योगेश लिचडे यांनी कमी- अधिक क्षमतेची शेतीपयोगी यंत्रे विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
आंतरमशागतीसाठी मिनी ट्रॅक्‍टर
योगेश यांनी लहान शेतकऱ्यांसाठी खास मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor) विकसित केला आहे. त्यात चार फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स गिअर वापरला आहे. सामान्यतः गिअर हे इंजिनशी जोडलेले असल्यामुळे आवश्यक ती ताकद मिळवण्यामध्ये अडचणी येतात.
शेतकऱ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी योगेश यांनी इंजिन आणि गिअर विभाग स्वतंत्र ठेवले असून, चेनव्हिलद्वारे जोडले आहे.
केवळ या एकाच बदलामुळे ट्रॅक्टर चार्जिग मोटार, पेट्रोल किंवा डिझेल इंजिन या पैकी काहीही जोडून चालवता येत असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यासाठी केवळ इंजिनचा विभाग बदलण्याची आवश्यकता भासते.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »