शिक्षकमित्रांच्यासहकार्यानेशाळापूर्वतयारीमेळावाक्रमांक -1 उत्साहातसाजरा
दिघवद वार्ताह(कैलास सोनवणे) :
शिक्षकमित्रांच्या सहकार्याने शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक -1 उत्साहात साजरा
दिनांक -18/4/2024 वार -गुरुवार मा .मुख्य कार्येकारी अधिकारी ,नाशिक आदरणीय आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून मॉडेल स्कूल म्हणून निवड झालेल्या जि.प. सेमी प्राथमिक शाळा दिघवद ता चांदवड येथे भविष्यवेधी शिक्षण विचार या उपक्रमाद्वारे शाळेतील उपक्रमशील शिक्षक प्रकाश बंजारा यांच्या शिक्षकमित्र या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या सहकार्याने इयत्ता पहिलीत दाखलपात्र विद्यार्थ्यांचा शाळापूर्व तयारी मेळावा क्र-1 उत्साहात संपन्न झाला.विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी तसेच त्यांचे शिक्षण आनंददायी व्हावे याहेतूने शासनाने शाळापूर्व तयारी मेळावा हा उपक्रम सुरू केलेला आहे.यात विद्यार्थ्यांच्या शारीरिक बौद्धिक भावनिक आणि भाषिक विकास होण्यासाठी 1 ते 7 स्टॉल लावण्यात आहे होते.
प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमर मापारी ,माजी उपाध्यक्ष किरण मापारी ,सदस्य प्रकाश मापारी दिघवद केंद्राचे केंद्रप्रमुख निवृत्ती बच्छाव ,मुख्याध्यापिका अलका बोरसे , शिक्षिका प्रिया शिंदे ,संगिता महाले
अंगणवाडी सेविका अर्चना गांगुर्डे ,कमल पाटील ,भारती गांगुर्डे ,पुष्पा निखाडे,तसेच पालक प्रकाश मापारी सागर मापारी भरत मापारी अरुण मापारी सोमनाथ गांगुर्डे ,विक्रम मापारी,किशोर राजनोर ,गोविंद गाढे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.