नागरिकत्व (सुधारणा) कायदा, 2024 अंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पश्चिम बंगालमध्ये सुरू
हरियाणा आणि उत्तराखंडच्या अधिकारप्राप्त समित्यांनीही आज आपापल्या राज्यांमधील अर्जदारांच्या पहिल्या संचाला नागरिकत्व केले बहाल
by PIB Mumbai
नागरिकत्व (सुधारणा) कायदा, 2024 अंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया आता पश्चिम बंगालमध्ये सुरू झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये आज राज्यभरातून आलेल्या अर्जांच्या पहिल्या संचाला अधिकार प्राप्त समितीने नागरिकत्व बहाल केले.
त्याचप्रमाणे, हरियाणा आणि उत्तराखंड राज्यांच्या अधिकारप्राप्त समित्यांनी देखील आज नागरिकत्व (सुधारणा) नियम, 2024 अंतर्गत त्यांच्या संबंधित राज्यांतील अर्जदारांच्या पहिल्या संचाला नागरिकत्व बहाल केले आहे.
नागरिकत्व (सुधारणा) कायदा, 2024 च्या अधिसूचनेनंतर नागरिकत्व प्रमाणपत्रांचा पहिला संच दिल्लीतील अधिकार प्राप्त समितीने मंजूर केला आणि 15 मे 2024 रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह सचिवांनी अर्जदारांना सुपूर्द केला.
भारत सरकारने 11 मार्च 2024 रोजी नागरिकत्व (सुधारणा) कायदा, 2024 अधिसूचित केला होता.