ज्येष्ठ नागरिक ही देशाची अमूल्य संपत्ती … अशोक नाना होळकर.


चांदवड= दिघवद , दहिवद बोपाने, पाटे या चार गावांमिळून जय हनुमान ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना करण्यात आली. आज दिघवद येथे ज्येष्ठ नागरिकांची सभा आयोजित केली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी मा शंकरराव निखाडे होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे नाशिक प्रादेशिक विभाग( फेसकॉम) चे अध्यक्ष मा. अशोक नाना होळकर, बाळासाहेब शेळके, अशोक काका व्यवहारे, प्रा. निकम टी पी, सरपंच वाल्याबाई पवार, ग्रामसेवक जाधव साहेब, एस आर शिंदे, शिवाजीराव होळकर, श्री डांगळे साहेब, गंगाधर सोनवणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते .उपस्थित सर्व मान्यवरांचा नूतन कार्यकारिणीच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्प देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला.


अशोक नाना होळकर यांनी गठित केलेल्या नूतन कार्यकारिणीची नावे वाचून जाहीर केली व ज्येष्ठांना  त्यांच्या मानसिक, शारीरिक व बौद्धिक आरोग्याची निगा राखण्यासाठी मार्गदर्शन केले ,ज्येष्ठांच्या सर्व प्रकारच्या सवलती, योजना व फायदे मिळवून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. प्रा. निकम टी पी यांनी जेष्ठ नागरिक संघाचा उद्देश, ज्येष्ठांना मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या शासनाच्या सोयी, सवलती, योजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. अशोक काका व्यवहारे व संघाचे अध्यक्ष शंकरराव निखाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केल.
प्रमुख पाहुणे अशोक नाना होळकर यांच्या शुभहस्ते नूतन कार्यकारणीचे अध्यक्ष शंकरराव निखाडे, उपाध्यक्ष मनोहर ठोके, सचिव चंद्रभान बोराडे, खजिनदार रामभाऊ हांडगे, सदस्य यमुनाबाई मापारी, इंदुबाई गांगुर्डे, कचरू हेरे, शिवाजी गांगुर्डे यांचा शाल, श्रीफळ, पुष्प देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्रा निकम टी पी यांनी केले. आभार पवारसर यांनी मानले. सभास्थानी मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक बंधू व भगिनी उपस्थित होते.

पत्रकार -

Translate »