कोकणासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस, हवामान विभागाचा हायअलर्ट

pause

कोकणासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस, हवामान विभागाचा हायअलर्ट

पुणे, अहमदनगर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, बीड, संभाजीनगर आणि पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात शनिवारी पावसाने धुमाकूळ घातला. पुण्यात ढगफुटीसदृश्य पावसाने रस्ते पाण्याखाली गेले होते. यामुळे वाहतुकीचाही खोळंबा झाला होता.

हवामान विभागाने आजही पुणे, अहमदनगर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, बीड, संभाजीनगर आणि पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. सिंधुदुर्गात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केले आहे. समुद्रात ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छिमारांना समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा देखील देण्यात आलेला आहे.

बीड जिल्ह्यात मध्यरात्री जोरदार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आलेला आहे तर शेतामध्ये पाणी साचले आहे.. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने सुरुवात केल्याने शेतकरी समाधानी आहे तसेच पेरणीच्या कामाला वेग आला आहे.. आणखी चार दिवस हवामान विभागाने बीड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात काल मुसळधार पाऊस झाल्याने या पावसामुळे हातकणंगले मधील रेल्वे पुलावरून मोठ्या प्रमाणात बायपास रोडवर पाणी वाहत होते.

Short :

शनिवारी काय घडलं?

  • पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. पुण्यात अनेक रस्ते पाण्याखाली गेले आणि वाहतुकीचा खोळंबा झाला.
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला. नागरिकांना घरातच राहण्याचा आणि योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मच्छिमारांना समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
  • बीड जिल्ह्यात मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. नदी-नाल्यांना पूर आला आणि शेतात पाणी साचले. शेतकरी समाधानी आहेत कारण जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने हंगामाची सुरुवात झाली आहे.
  • कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळपासून पाऊस सुरू आहे. हातकणंगले तालुक्यात मुसळधार पावसामुळे रेल्वे पुलावरून पाणी वाहत होते.

पुढे काय?

  • पुढील चार दिवसांत बीड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
  • इतर प्रभावित जिल्ह्यांमध्येही पावसाला तीव्रता आणण्याची शक्यता आहे.

सावधगिरी बाळगा!

  • नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा आणि सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला जातो.
  • पूरग्रस्त भागात जाण्यापासून दूर रहा.
  • अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करा.

पत्रकार -

Translate »