अवर्षणग्रस्त खेडयातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी  GR

अवर्षणग्रस्त खेडयातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी 

कृषी न्यूज : अवर्षणग्रस्त खेडयातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी या योजनेसाठी आर्थिक वर्ष सन 2023-24 मध्ये अर्थसंकल्पीत निधी वितरीत करणेबाबत GR आला आहे..

महाराष्ट्र शासनाच्या दिनांक १० नोव्हेंबर २०२३ च्या महसूल व वन विभागाच्या क्रमांक (२) च्या शासकीय निर्णयानुसार राज्यातील दुष्काळग्रस्त घोषित ४० तालुक्यांव्यतिरिक्त १०२१ महसूल मंडळात दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ च्या महसूल व वन विभागाच्या क्रमांक (३) च्या शासकीय निर्णयानुसार ज्या १०२१ महसूल मंडळात दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली होती त्यापैकी नवीन तयार झालेल्या महसूल मंडळात दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून सवलतींचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, “दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा फी माफी योजना” या योजनेबाबत दिनांक २९ मे २०२४ रोजी संचालक उच्च शिक्षण विभाग यांचे पत्र क्रमांक (४) च्या संदर्भात या योजनेसाठी लेखा शीर्षाखाली वित्तीय वर्ष २०२४-२५ मध्ये निधीची तरतूद करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

पत्रकार -

Translate »